Omicron Variant : ओमिक्रॉनचं संकट! राज्य सरकार सतर्क, उचलली 'ही' पावलं, मुख्यमंत्री आज आढावा घेणार

MVA govt on Coronavirus new Omicron Variant : आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटने जगभरात खळबळ उडाली आहे. जगातील अनेक देश सतर्क झाले असून कोरोनाच्या या नव्या व्हेरियंटचा संसर्ग होऊ नये यासाठी पावले उचलली जात आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही सतर्क झाले असून विषाणूच्या या नव्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडी सरकारकडून दक्षिण आफ्रिकेतून सुरू असणाऱ्या विमान सेवेवर बंदी घालण्याचा विचार राज्य सरकारकडून सुरू आहे. आज संध्याकाळी पाच वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील कोरोना परिस्थिती आणि नव्या व्हेरियंट बाबत करण्यात आलेल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. या बैठकीला आरोग्य मंत्री राजेश टोपे, टास्क फोर्सचे सदस्य उपस्थित राहणार आहेत.

ओमिक्रॉन व्हेरियंटचा एकही रुग्ण आढळल्यास संपूर्ण इमारत सील होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय

काही दिवसांपूर्वीच दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा नवा व्हेरियंट आढळला होता. आफ्रिका खंडातील इतर देशांमध्येही कोरोनाच्या या नव्या विषाणूचा संसर्ग फैलावला आहे. बोत्सवानामध्ये या नव्या व्हेरियंटचे 32 म्युटेशन आढळले आहेत. हा व्हेरिएंट अधिक वेगाने फैलावत असल्याने जगभरात चिंता व्यक्त केली जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. त्यामुळे राज्य सरकार अधिक सतर्क झाले आहे. दक्षिण आफ्रिकेतील विमान उड्डाणांवर बंदी घालण्याचा केंद्र आणि राज्य सरकार विचार करत आहे. तर, येत्या 3 डिसेंबरपासून वानखेडे स्टेडियमवर सुरू होणाऱ्या भारत-न्यूझीलंड दरम्यानच्या दुसऱ्या कसोटी सामन्यावरही कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट आहे. वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या कसोटी सामन्यात 50 टक्केच प्रेक्षक क्षमता केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

<a href="https://ift.tt/3HY9W7p Vaccination : लसीकरण न झालेल्या प्रवाशांना 500 रुपये तर दुकानदार, खासगी वाहतूकदारांना 10 हजारांचा दंड लागणार

आफ्रिकेतून येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईन करणार - मुंबई महापालिका
नव्या व्हेरियंटसोबत लढण्यासाठी आता मुंबई महापालिका सरसावली असून मुंबई विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना 14 दिवस क्वॉरंटाईनमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेच्या काल झालेल्या महत्वाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आफ्रिकेतून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता 14 दिवस क्वॉरंटाईन केलं जाणार असून त्यांची दर 48 तासांनी कोरोना टेस्ट केली जाणार आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी आज केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे.

विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची ट्रॅव्हल हिस्ट्री तपासली जाणार आहे. जर एखाद्या व्यक्तीने गेल्या 14 दिवसांत आफ्रिकेतील कोणत्या देशाचा दौरा केला असेल तर त्याचीही तपासणी केली जाणार आहे. याचप्रमाणे मुंबईतील जंबो कोव्हिज सेंटरचे फायर ऑडिट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

<a href="https://ift.tt/3HY9W7p Vaccination : लसीकरण न झालेल्या प्रवाशांना 500 रुपये तर दुकानदार, खासगी वाहतूकदारांना 10 हजारांचा दंड लागणार

दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रॉन या नव्या विषाणूमुळे जगभरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर चिंता वाढलीय. कारण हा नविन विषाणू डेल्टाप्लस पेक्षा ही भयंकर असल्याची चिंता तज्ञांनी व्यक्त केलीय. दक्षिण आफ्रिकेतून येणाऱ्या विमानांवर मुंबई विमानतळावर बंदी घालण्याची मागणी काल केंद्र सरकारकडे राज्याने केली आहे. तर काल जाहीर केलेल्या नियमावलीत नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर देण्यात आला असून दंडात ही मोठ्या प्रमाणावर वाढवण्यात आली आहे.

ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील
मुंबई महापालिकेने ओमिक्रॉन व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहे. ओमिक्रॉन व्हेरियंट बाधित आढळल्यास संबंधित इमारत सील करण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.  दक्षिण आफ्रिकेसह काही देशांमध्ये कोविड-१९ चा नवा घातक व्हेरियंट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार काल नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, महानगरपालिकांचे आयुक्त, नगरपालिकांचे मुख्याधिकारी यांची दूरदृश्य प्रणालीद्वारे तातडीची बैठक घेतली. बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांचेसह ठाणे, रायगड, पालघर आदी जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, सर्व महापालिका आयुक्त, मुख्याधिकारी उपस्थित होते.

मुंबई महापालिकेने आखल्या उपाययोजना

मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी संभाव्य धोक्याच्या पार्श्वभूमीवर केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. विमानतळावर उतरलेल्या प्रवाशांना संस्थात्मक विलगीकरण सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत घरी विलगीकरणात ठेवण्यात येणार नाही. दुर्दैवाने या नव्या व्हेरियंटने बाधित रुग्ण आढळून आल्यास त्याच्यावर कोरोना उपचार केंद्रांमध्ये स्वतंत्रपणे उपचार करण्यात येणार आहेत. मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व रुग्णालयांचे तसेच कोविड उपचार केंद्रांचे संरचनात्मक, अग्निशमन, आणि विद्युत ऑडिट करुन त्याची चाचणी  घेण्यात येणार आहे.   घातक व्हेरियंटचा एकही रुग्ण जर एखाद्या इमारतीत आढळला तर संपूर्ण इमारत सील करण्यात येणार असल्याचेही काकणी यांनी सांगितले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/coronavirus-new-omicron-variant-maharashtra-govt-and-bmc-vigilant-chief-minister-thackeray-will-review-today-1015004

Post a Comment

0 Comments