<p>महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज भाऊबीजेच्या मुहूर्तावर नव्या घरात प्रवेश केला आहे. अमित ठाकरे यांनी आज या नव्या घराच्या नामफलकाचं उद्घाटन केलं. राज ठाकरेंच्या या नव्या घराचं नाव असणार आहे शिवतीर्थ. दादर येथील 'कृष्णकुंज'शेजारीच नवी पाच मजली इमारत बांधण्यात आली आहे. यामध्ये राज ठाकरे आज कुटुंबासह गृहप्रवेश करणार आहे. </p> <p>थोड्याच वेळात राज ठाकरे यांच्या नव्या 'शिवतीर्थ' वास्तुच्या वरती भगवा झेंडा फडकावत प्रवेश करतील. यासाठी जय्यत तयारी सध्या सुरू आहे. शिवसेनेच आदराचं स्थान अर्थात शिवाजी पार्कातील शिवतीर्थ. आता राज ठाकरे यांनी आपल्या नवीन वास्तुचं नाव शिवतीर्थ ठेवल्यानंतर शिवसेनेची चांगलीच गोची झाली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-raj-thackeray-new-home-named-shivtirth-1011344
0 Comments