<p><strong>Mumbai Cruise drug case :</strong> मुंबईमधील क्रूझ ड्रग्ज प्रकरणानंतर समीर वानखेडे यांचं नाव प्रकाशझोतात आले. आर्यन खानला अटक केल्यानंतर अनेकांकडून समीर वानखेडे यांच्या कारवाईवर आक्षेप घेण्यात आला होता. त्यांच्यावर अनेक आरोप झाले. त्यातच शुक्रवारी समीर वानखेडे यांच्याकडून आर्यन खानसह इतर सहा ड्रग्ज केसचा तपास काढून घेतल्याच्या बातम्या आल्या. यावर आता एनसीबीकडून स्पष्टीकरण आलं आहे. समीर वानखेडे यांची बदली अथवा त्यांच्याकडून कोणत्याही केसेसचा तपास काढून घेतलेला नाही, अशाप्रकारचं स्पष्टीकरण आलं.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-sameer-wankhede-removed-from-six-cases-including-that-of-shah-rukh-khan-s-son-aryan-khan-1011332
0 Comments