<p>सोलापूर शहरात एका बँकेचं एटीएम क्लोन करण्यात आल्याचा संशय आहे...एटीएमच्या रीडर समोर संशयास्पद उपकरण आढळून आलंय..रेल्वे लाईन परिसरात असलेल्या बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये हा प्रकार घडसाय.. सकाळी साडेअकराच्या सुमारास शंकर लोखंडे नावाचे ग्राहक एटीएममध्ये आले..यावेळी लोखंडे यांनी एटीएममधून पैसे काढण्याचा प्रयत्न केला..तेव्हा एटीएम रीडरच्या समोर आणखी एक डिव्हाईस लावलं असल्याचं त्यांच्या लक्षात आलं..त्यांनी बँकेशी संपरक साधला..बँकेचे अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले..त्यानंतर सीसीटीव्ही फुटेजही तपासण्यात आलंय..दरम्यान या प्रकरणात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही..</p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-solapur-atm-clone-update-1015023
0 Comments