मास्क आणि सॅनिटायझर खाली साडे सात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना अटक

मास्क आणि सॅनिटायझर खाली साडे सात लाखांचा गांजा लपवून कारमधून तस्करी करणाऱ्या दोघांना नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. नागपूर चंद्रपूर महामार्गावर बुटीबोरी या ठिकाणी पवन कश्यप आणि दीपक शर्मा हे दोन आरोपी कार मधून गांजा तस्करी करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती.. त्या आधारे काल संध्याकाळी पोलिसांनी बुटीबोरी वाय पॉईंटवर नाकाबंदी सुरू केली होती. त्या दरम्यान चंद्रपूर वरून नागपूर कडे येणाऱ्या कारच्या सीटच्या खाली जागा बनवून गांजा लपवल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे त्यावरती मास्क आणि सॅनिटायझर चे एक थर लावून गांजा त्याखाली लपवण्यात आला होता. पोलिसांनी सुमारे 75 किलो गांजा जप्त केला आहे.. नव वर्षाच्या स्वागतासाठी नशेखोरांच्या पार्टीसाठी गांजाची ही खेप आणली जात असल्याची माहिती आहे.

अहमदनगरमध्ये 'योगायोग' शब्दावरून काँग्रेस आणि शिवसेनेच्या मंत्र्यांत कलगीतुरा, नेमकं काय घडलं?

काँग्रेसचे नेते (Congress) महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thackeray) आणि शिवसेनेचे नेते (Shiv Sena) जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख (Shankarrao Gadakh) यांच्या उपस्थितीत आज अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन वास्तूच लोकार्पण सोहळा संपन्न झाला.. यावेळी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांसह पदाधिकारी व अधिकारी वर्ग उपस्थित होता. यावेळी सोहळ्याच्या भाषणात 'योगायोग' शब्दावरून दोन्ही मंत्र्यांमध्ये कलगीतुरा पाहायला मिळाला. त्याला कारण होतं 2014 ला थोरातांच्या हस्ते ज्या वास्तूचे भूमिपूजन झाले त्याच थोरात यांच्या हस्ते 8 वर्षांनी या वास्तूचे लोकार्पण पार पडले.बाळासाहेब थोरात 2014 ला महसूल मंत्री असताना अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचे भूमिपूजन झालं होतं आणि आज 8 वर्षांनी त्यांच्या हस्ते महसूल मंत्री असताना या वास्तूचे लोकार्पण पार पडत असल्यानं जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी या योगायोगावरून भाष्य केले आणि त्याला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपल्या भाषणातून प्रत्युत्तर देताना हा योगायोग अजून किती वर्षे चालेल माहीत नाही. तुम्ही बरोबर आहात, पुढे गेले तरी त्यालाही शुभेच्छा, असं म्हटल्यानं एकच हशा पिकला.मंत्री शंकरराव गडाख म्हणाले की, 8 वर्षांपूर्वी थोरात साहेबांनी याची पायाभरणी केली. 8 वर्ष तसा मोठा काळ. आज 8 वर्षांनी थोरातांच्या हस्ते याचं उद्घाटन होत हा एक योगायोग आहे. योगायोगाचं दुसरं नाव बाळासाहेब थोरात हेच आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन राजकारणात काम केलं तर त्यांच्या इतकं नाही मात्र त्यांच्या पाठीमागे जाता येईल अशी मला खात्री वाटते, असं गडाख म्हणाले.

from maharashtra https://ift.tt/3FUZxYV
via IFTTT
0 Comments