<p>महाराष्ट्रातली कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्यावर निर्बंधांची टांगती तलवार आहे. काल दिवसभरात राज्यात ३ हजार ९०० नव्या कोरोना रुग्णांची नोंद झालेय आणि यातील जवळपास अडीच हजार रुग्ण एकट्या मुंबई आणि परिसरात सापडले आहेत. त्यामुळे राज्यात निर्बंध लागू होण्याची चिन्हं दिसतायत. आज राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आहे. आणि त्यात राज्यातल्या निर्बंधांविषयी चर्चा होणार आहे. मुंबईतील पॉझिटिव्हीटी रेट ४ टक्क्यांहून अधिक असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलीय.... कोरोनाबाधितांच्या संख्येत भर पडू लागल्यानं चिंताही वाढली आहे.</p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-corona-positive-maharashtra-1021896
0 Comments