Corona Vaccination For Children : मुलांच्या लसीकरणासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी; 3 जानेवारीपासून लसीकरण

देशातील <a href="https://ift.tt/3EJ1lCK ते 18 वर्षे वयोगटातील मुलांचं 3 जानेवारीपासून कोरोनाची लस दिली जाणार आहे. यासाठी आजपासून कोविन अ‍ॅपवर नोंदणी करता येणार आहे. नोंदणीसाठी इयत्ता दहावीचं ओळखपत्र देखील ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरला जाणार आहे. येत्या 3 जानेवारीपासून लहान मुलांच्या लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार आहे. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं गाईडलाईन्स जारी केली आहे. लहान मुलांना लस देण्यासाठीची सीरींज, नीडल कदाचित वेगळी असणार आहे. आज 1 जानेवारीपासून रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होणार आहे. CoWIN पोर्टलवर आणखी एक स्लॉट जोडण्यात येणार आहे. तिथून मुलांना लसीकरणासाठी स्लॉट बुक करता येणार आहे. CoWIN पोर्टलवर आपला <a href="https://ift.tt/3mBSYmn वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या आयकार्डचा वापर करावा लागणार आहे. ज्या मुलांकडे आधार कार्ड नसेल त्यांच्या लसीकरणात अडथळा येऊ नये म्हणून आयकार्डचा वापर करण्याचा पर्याय केंद्राकडून अंमलात आणण्यात आला आहे. भारत सरकारनं 15 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दोन लसींना मंजुरी दिली आहे. भारत बायोटेकची कोवॅक्सिन लसीचे दोन डोस आणि Zydus Cadila's ZyCoV-D चे तीन डोस या लसींमधून पर्याय निवडावा लागणार आहे.

मुलांच्या लसीकरणासाठी स्लॉट कसा बुक कराल? (How To Book COVID-19 Vaccine Slot For Children)

लहान मुलांसाठी COVID-19 वॅक्सिन स्लॉट बुक करण्यासाठी फारसं काही नवीन करण्याची गरज नाही. यापूर्वी लसीकरणासाठी स्लॉट बुक करण्याची जी प्रक्रिया होती तिच फॉलो करावी लागणार आहे. वॅक्सिनचा स्लॉट रजिस्टर करण्यासाठी CoWIN पोर्टल (cowin.gov.in) वर लॉगइन करा. आधार कार्ड किंवा मोबाईल क्रमांकाचा उपयोग करुन रजिस्ट्रेशन करा. विद्यार्थी शाळेच्या आयकार्डचा वापरही करु शकतात.

संमोहित करून दौंड मधील व्यापाऱ्याला लुटले, लुटीचा प्रकार CCTV मध्ये कैद

दौंड मधील व्यापाऱ्याला दोघा जणांनी संमोहित करून 1 लाख 16 हजार रुपये लुटले आहे. दौंड शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या विलास क्लॉथ स्टोअर मध्ये सॉक्स घेण्याच्या बहाण्याने दुकानात प्रवेश करत तिथे असलेल्या मॅनेजरला स्वतःच्या नोटा दाखवत संमोहित केले आणि त्यानंतर स्वतः गल्ल्यात हात घालून 1 लाख 16 हजार रुपये विलास क्लॉथ स्टोअरच्या मॅनेजर समोर काढून घेतले. हा सगळा धक्कादायक प्रकार दिवसाढवळ्या आणि CCTV कैद झाल्याने खळबळ उडाली आहे.

from maharashtra https://ift.tt/32Kj2EF
via IFTTT
0 Comments