<p>वातावरणीय बदलांमुळे ऋतुचक्र गडबडल्याची प्रचिती पुन्हा एकदा राज्यात अनुभवायला मिळतेय. कालपासून विदर्भ आणि मराठवाड्याला मुसळधार पाऊस आणि गारपीटीनं झोडपलंय. हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे काल औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूर, वैजापूर तालुक्यात जोरदार काल पाऊस झालाय. देवगाव, शनि चेंडूफळ, बाजाठाण, गाढेपिंपळगाव, मांजरी फाटा, गंगापुर या भागात गारपीट ही पाहायला मिळाली.. वाशिमच्या कारंजा तालुक्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. सध्या तूर काढणीचा हंगाम सुरू आहे..तर हरभरा, फळभाजी पिकांचं नुकसान झालंय.अहमदनगर जिल्ह्यातही गारांचा पाऊस झाला.. श्रीरामपूर, नेवासा तालुक्यात जोरदार गारपीट झाली. अचानक झालेल्या पावसाने नागरिकांसह बळीराजाची चांगलीच तारांबळ उडाली.हवामान विभागाने विदर्भात २ दिवस ऑरेंज अलर्ट दिलाय.. त्यानुसार)) नागपूर जिल्ह्यातील नरखेड तालुक्यातल्या वाढोना आणि मेंढला परिसरात पावसासह गारपीट झालीय. यामुळे संत्रा पिकाचं नुकसान झालंय.अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यातील अनेक गावांना पावसासह गारपिटीचा फटका बसला. ऐन हिवाळ्यात आलेल्या या पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र पाणी आलेय. शेतात असलेल्या हरभरा तसेच गव्हाच्या पीकांच नुकसान झालं आहे. संत्र्याच्या बागांनाही या पाऊस आणि गारपिटीचा फटका बसलाय. सध्या तूर काढणीचा हंगाम आहे.. या पावसामुळे भाज्यांचंही मोठं नुकसान झालंय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-uncertain-rain-and-hailstorm-1021634
0 Comments