MLA Chandrakant Jadhav Death : कोल्हापूर उत्तरचे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचं निधन झालं आहे. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जाधव हे एका महिन्यात आमदार म्हणून निवडून आले होते.

कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे हैदराबादमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर हैदराबाद येथील रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र आज पहाटे त्यांची प्राणज्योत मालवली.

आमदार चंद्रकांत जाधव यांना दीड वर्षात दोन वेळा कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळत गेली. मध्यंतरी प्रकृती ठणठणीत झाल्याने ते पुन्हा आपल्या सामाजिक आणि राजकीय कार्यात सक्रिय झाले होते. मात्र आठ दिवसांपूर्वी पुन्हा त्रास जाणवू त्यांना हैदराबाद मध्ये दाखल करण्यात आले होते.

सर्वच पक्षातील नेत्यांशी जाधव यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. निवडणुकीच्या आधी केवळ पंधरा दिवस काँग्रेसमध्ये प्रवेश करून 2019 साली त्यांनी शिवसेनेचे राजेश क्षीरसागर यांचा त्यांनी पराभव केला होता. अतिशय मनमिळावू आणि लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिकांपर्यंत सगळ्यांचे लाडके आण्णा म्हणून ते परिचित होते.राजकारणापेक्षा सामाजिक कार्यात ते अधिक व्यस्त असत.

कोल्हापुरातील फुटबॉल आणखी वाढावा यासाठी त्यांचा प्रयत्न होता. कोल्हापुरातील पेठांमध्ये चंद्रकांत जाधव अण्णा यांचा घराघरांत वावर असायचा. कोल्हापुरातील तालमी, कोल्हापुरातील सामाजिक संघटना यांना चंद्रकांत जाधव यांनी भरघोस मदत केली. आज जाधव आण्णा त्यांच्या जाण्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-kolhapur-mla-chandrakant-jadhav-death-latest-news-update-1015726
0 Comments