<p>ऐन हिवाळ्यात मुंबईसह राज्यभरात पावसाच्या सरी कोसळताहेत. मुंबईसारखाच कोकणातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगावात पावसाच्या सरी बरसताहेत. अवकाळी पावसामुळे नाशकातील कांदा पिकासह द्राक्षबागांचं नुकसान झालंय. साताऱ्यातलं स्ट्रॉबेरी पीक धोक्यात आलंय. पालघर जिल्ह्यात भातशेती पाण्यात गेली. रत्नागिरी, सिंधुदुर्गात आंबा आणि काजू पिकाला मोठा फटका बसलाय. त्यात आज आणि उद्याही हवामान खात्यानं पावसाचा इशारा दिलाय. त्यामुळे बळीराजा देवच पाण्यात ठेवून बसलाय. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-rains-unseasonal-rains-hit-fruit-crops-1015727
0 Comments