<p>बीडच्या केज नगरपंचायतीत काँग्रेस आणि जनविकास आघाडी सत्ता स्थापन करणार आहे. काँग्रेसचे आदित्य पाटील आणि जनविकास आघाडीचे हारुन इमानदार यांनी हि माहिती दिली आहे. केंज नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेस आणि जनविकास आघाडी स्वतंत्र निवडणूक लढले होते. दरम्यान निवडणुकीत कोणत्याही पक्षाला बहुमत मिळालेलं नव्हतं. त्यामुळे याठिकाणी कोण सत्ता स्थापण करणार असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, खासदार रजनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनविकास आघाडी आणि काँग्रेसनं एकत्र येत सत्ता स्थापण केली आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-congress-and-janvikas-aaghadi-to-form-government-in-kej-beed-1028585
0 Comments