मुंबई : केंद्रीय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Pm Narendra Modi) आज देशभरातील जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधणार संवाद आहेत. आज सकाळी 11 वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान संवाद साधतील. महाराष्ट्रातून नंदुरबारचे जिल्हाधिकारी या संवादावेळी उपस्थित राहणार आहेत. त्याबरोबरच प्रेटोकॉल म्हणून सर्व राज्यांचे मुख्यमंत्रीही यावेळी उपस्थित राहणार आहेत.

पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, "नरेंद्र मोदी जिल्ह्यातील सरकारी योजना आणि कार्यक्रमांच्या अंमलबजावणीची प्रगती आणि सद्यस्थिती याबद्दल जिल्हाधिकारी यांच्याकडून आढावा घेतील. त्यामुळे या संवादातून सरकारी योजनांची सद्यस्थिती कळेल. याबरोबरच या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून हे देखील समोर येईल की जिल्ह्यांमध्ये सध्या कोणत्या समस्या आहेत."

केंद्राच्या विविध योजना लवकरात लवकर जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्याचा या संवादाचा उद्देश आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ''पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली सरकारने देशभरातील विकास आणि विकास कामांमध्ये येणाऱ्या समस्यांवर मात करण्यासाठी सातत्याने पावले उचलली आहेत. देशभरातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि सर्वांसाठी सर्वसमावेशक विकासासाठी सरकार वचनबद्ध आहे."

पंतप्रधान मोदी जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते

दरम्यान, अमेरिकन डेटा इंटेलिजन्स फर्म 'द मॉर्निंग कन्सल्ट'च्या नुकत्याच करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार, देशातील कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेतही पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पुन्हा एकदा जगातील सर्वात लोकप्रिय नेते म्हणून निवडले गेले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता रेटिंगमध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्यासह जगातील 13 राष्ट्रप्रमुखांना मागे टाकले आहे.

महत्वाच्या बातम्या

<a href="https://ift.tt/3KAEi1d Police : मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील टोके निलंबित; ट्राफिक विभागातील घोटाळ्याचा केला होता पर्दाफाश

<a href="https://ift.tt/3fKjENV Police : ट्राफिक पोलिसांच्या भ्रष्टाचाराविरोधात एका पोलिसाचीच हायकोर्टत जनहित याचिका

दिवसाला विना मास्क फिरणाऱ्या 100 जणांवर कारवाई करा; पोलीस आयुक्तांचे मुंबई पोलिसांना टार्गेट

सार्वजनिक सुट्टी मागणं हा नागरीकांचा कायदेशीर अधिकार नाही : हायकोर्ट

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/pm-narendra-modi-will-interact-with-district-magistrates-of-many-districts-through-video-conferencing-1027393
0 Comments