Sangli News : सांगली जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या सांगलीतील निवासस्थानी राडा झाला. सोमवारी रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. एका निविदेच्या वादातून हाणामारी झाली असल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या पतीने ही तक्रार दाखल केली आहे.

आरोच्या निविदेवरून दोन गटात वाद झाल्याची चर्चा आहे. निविदेवरून दोन गटांमध्ये जोरदार वाद झाला. या वादातून हाणामारी आणि तोडफोड करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्राजक्ता कोरे यांचे पती नंदू कोरे, कुटुंबातील अन्य आणि जिल्हा परिषद सभापती आणि काही सदस्यांमध्ये वाद झाला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानात दारू पिऊन येऊन सभापती आणि काही सदस्यांनी मला आणि माझ्या भावास मारहाण केल्याचा आरोप नंदू कोरे यांनी केला. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या निवासस्थानाततील खुर्च्या, कुंड्याची देखील तोडफोड करण्यात आली.

या तोडफोड प्रकरणी सांगली जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापती भाजपचे प्रमोद शेंडगे, भाजपच्या महिला बाल कल्याण सभापती सुनिता पवार यांचे पती सुनील पवार, शिक्षण व आरोग्य सभापती आशा पाटील यांचे पती सुनील पाटील, भाजपचे अरुण बालटे, अपक्ष सदस्य संभाजी कचरे यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली. तर, प्रमोद शेंडगे यांनी आरोप फेटाळून लावत आम्हालाच जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांचे पती आणि दीर यांनी मारहाण केली असल्याचा आरोप केला.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

MPSCच्या 86 परीक्षार्थींना हायकोर्टाचा दिलासा, 29 जानेवारीच्या परीक्षेला बसू देण्याचे आयोगाला निर्देश

आनंद महिंद्रांनी शब्द पाळला, सांगलीच्या रॅन्चोला मिनी जिप्सीच्या बदल्यात मिळाली नवी कोरी Bolero

<a href="https://ift.tt/3FXEsvZ Patole : नाना पटोलेंना ते वक्तव्य भोवण्याची चिन्हं, भाजप युवा मोर्चाची पटोलेंविरोधात कोर्टात याचिका

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/sangli-zilha-parishad-president-bungalow-vandalized-on-tender-dispute-1028098
0 Comments