<p>पालक आणि शिक्षणतज्ज्ञांच्या मागणीनंतर सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. शाळा सुरु करायच्या की नाहीत याचा निर्णय घेण्याचा अधिकार स्थानिक प्रशासनाला बहाल करण्यात आलाय. दरम्यान शाळा सुरु करण्याबाबत महत्त्वाच्या महापालिकांनी वेगवेगळी भूमिका घेतल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. मुंबई महापालिका क्षेत्रात सोमवारपासून शाळा सुरु करण्याचा निर्णय मुंबईचे पालकमंत्री आदित्य ठाकरे आणि आयुक्त इक्बाल चहल सिंह यांनी घेतलाय. पुण्यातल्या शाळा सुरु करण्याबाबत महापौर मुरलीधर मोहोळ उत्सुक दिसत नाहीत.. तर तिकडे औरंगाबाद शहरातल्या शाळा 30 जानेवारीपर्यंत शाळा सुरु होणार नाहीत.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-maharashtra-schools-to-reopen-from-monday-24-january-1027174
0 Comments