<p>विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरुन ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यात रंगलेलं लेटरवॉर महाराष्ट्रानं पाहिलं. हे प्रकरण ताज असतानाच आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी मुंबई महापालिकेच्या खांद्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना नवा झटका दिल्याची चर्चा आहे. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेतील कथित गैरव्यवहाराची चौकशी करण्याचे आदेश राज्यपालांनी लोकायुक्तांना दिलेत. मुंबई महापालिकेच्या आश्रय योजनेत 1 हजार 844 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप आणदार मिहीर कोटेचा आणि काही नगरसेवकांनी केलाय. भाजपच्या शिष्टमंडळानं राज्यपालांना भेटून या प्रकरणाची चौकशी कऱण्याची मागणी केली होती. आश्रय योजनेतंर्गत कर्मचाऱ्यांसाठी घरं बांधण्यात येणार आहे.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-bhagat-singh-aashray-yojna-inquiry-uddhav-thackeray-1022573
0 Comments