Kolhapur : कुख्यात गुंड Sanjay Tandel याला अटक, 2 वर्षांपासून झाला होता फरार

<p>कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी नगरपालिकेचा नगरसेवक आणि कुख्यात गुंड संजय तेलनाडे याला शनिवारी पुण्याच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने अटक केलंय. मागील 2 वर्षांपासून पोलीस त्याच्या शोधात होते. संजय तेलनाडे आणि त्याचा नगरसेवक भाऊ सुनिल या दोघांनी &lsquo;एस.टी. सरकार&rsquo; या नावाने संघटित गुन्हेगारी टोळी बनवली होती. तेलनाडे बंधूंच्या विरोधात वेगवेगळे 17 प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत. या दोन्ही भावांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. 2 वर्षांपासून संजय तेलनाडे फरार झाला होता. तो पुण्यात असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolhapur-sanjay-tandel-arrested-of-st-sarkar-by-police-1022570

Post a Comment

0 Comments