Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 02 जानेवारी 2022 : रविवार : ABP Majha

दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.

१. मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा मार्गावर 24 तासांचा जम्बो ब्लॉक, पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या काम, ठाणे-कल्याण धीम्या मार्गावर वाहतूक बंद

२. आरोग्य व्यवस्था सक्षम करा, ओमायक्रॉन आणि वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्राचे राज्यांना पत्र, तर लॉकडाऊन नाही तर कठोर निर्बंध येणार, टोपेंची माहिती

३. मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसैनिकांकडून हरताळ, जमावबंदी असताना मुंबईतील अंधेरीत मालवणी जत्रोत्सव तर नाशिकमध्येही सेनेच्या कार्यक्रमात कोरोना नियमांचा फज्जा

४. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना ओमायक्रॉनची बाधा तर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना डेल्टाची लागण, एक अभिनेत्रीही कोरोनाच्या विळख्यात

५. राज्यावरील कोरोनाचे संकट अधिक गडद; काल नऊ हजार रुग्णांची नोंद; तर मुंबईत 6 हजार 347 नव्या रुग्णांची नोंद

राज्यावरील कोरोनाचे  (Coronavirus) संकट अधिक गडद होत असून आज रुग्णसंख्येत मोठी वाढ झाल्याचं पहायला मिळालं आहे. राज्यात आज तब्बल 9,170 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1,475  रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत असल्याचं दिसून येत आहे. राज्यात नाताळ, वर्षाअखेर आणि नवीन वर्ष यामुळे झालेल्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तसेच ओमायक्रॉन व्हेरियंटनेही चिंता वाढवली असून देशातील सर्वाधिक ओमायक्रॉन बाधित रुग्ण महाराष्ट्रात आहेत.   राज्यात आज  6 नव्या ओमायक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झालेली आहे. आतापर्यंत एकूण 460 ओमायक्रॉनबाधितांची नोंद  झाली आहे. मुंबईत आज 6 हजार 347 नवे रुग्ण आढळले आहे. पुणे जिल्ह्यात 631 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे.

६. पंतप्रधानांनी 12 कोटींची मर्सिडीज बेन्झ घेतली, आतातरी फकीर म्हणून घेऊ नये, संजय राऊतांची रोखठोकमधून टीका

शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सामना (Saamana)च्या रोखठोक (Rokhthok) कॉलममधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.  2021 साल सरले, पण 2022 या वर्षात आशेची किरणे दिसतील काय? असा सवाल करत राऊत यांनी पंतप्रधानांनी खरेदी केलेल्या गाडीवरुन देखील टीका केली आहे. राऊत म्हणाले की,  महागाई, बेरोजगारीवर उपाय नाही. पंतप्रधान मोदींसाठी 12 कोटींची नवी मर्सिडीज बेन्झ गाडी आता खरेदी केली. त्यातून सरकारची भ्रमंती चालली आहे, असं राऊत यांनी म्हटलं आहे.

७. मुंबईत ५०० चौरस फुटाखालील मालमत्ता कर माफ झाल्यानंतर इतर शहरांकडूनही करमाफीची मागणी, माजी आमदार आशिष देशमुख यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र

८. पुण्यातील एका पोलिसाकडून दुसऱ्या पोलिसाला मारण्यासाठी सुपारी, दत्तवाडी पोलिसांनी हाणून पाडला कट, सराईत गुन्हेगार गजाआड

९.माळेगावात बेलभंडारा उधळत खंडोबा यात्रेचा पालखी सोहळा संपन्न, 20 हजार भाविकांनी घेतला दर्शनाचा लाभ

१०. दिल्लीतील इंद्रपुरीत पोलीस आणि जमावात धुमश्चक्री, 50 ते 60 जणांची पोलिसांवर दगडफेक तर पोलिसांचा जमावावर गोळीबार

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/abp-majha-smart-bulletin-02-january-2022-maharashtra-latest-updates-1022568

Post a Comment

0 Comments