Sangli Crime News : आधी तरुणीला अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी, मग मागितली 20 लाखांची खंडणी; मिरजेतील एकजण ताब्यात

Sangli Crime News : मिरज तालुक्यातील बेडग येथील तरुणीचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो फेसबुक आणि व्हॅटसअॅपवर व्हायरल करण्याची तिला धमकी देण्यात आली. तसेच तिच्याकडे 20 लाखांची खंडणीही मागण्यात आली. काही दिवसांपूर्वीच सांगलीत हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बेडग येथील यल्लाप्पा चंद्रकांत कोळी आणि एका अज्ञात महिला साथीदार यांच्यावर मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. यल्लाप्पा चंद्रकांत कोळी यांस मिरज ग्रामीण पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे. आरोपीस न्यायालयासमोर हजर केलं असता त्याला 21 जानेवरीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती, मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बेंद्रे यांनी दिली आहे. दरम्यान या आरोपीसोबत ज्या अज्ञात महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. त्या महिलेचा या गुन्ह्याशी कसा संबंध आहे, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

मिरज तालुक्यातील  बेडग येथील एका महाविद्यालयीन युवतीच्या फोटोंचा वापर करुन संगणक आणि इतर आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अश्लील फोटो आणि चित्रीकरण करण्यात आलं. सदरचे फोटो आणि अश्लील चित्रफित तयार करून 20 लाख द्या, अन्यथा सर्व काही फेसबुक, व्हाट्सअॅप आणि युट्युबवर वर प्रसारित करू, अशी धमकी आरोपी यल्लाप्पा कोळी आणि साथीदार महिला यांनी दिली. संबंधीत संशयित वारंवार फोन करुन पैशांची मागणी करत होते. त्यामुळे त्यांच्या त्रासाला आणि धमकीला कंटाळून संबंधीत युवतीच्या नातेवाईकांनी ग्रामीण पोलिसांत धाव घेतली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, यल्लाप्पा चंद्रकांत कोळी आणि त्याच्या साथीदार महिलेवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, तरुणीच्या फिर्यादीनंतर याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत असून अटकेत असलेल्या आरोपीसोबत असलेल्या महिलेचा शोध सुरु आहे. तसेच, या महिलेचा गुन्ह्याशी नेमका संबंध काय? याचाही शोध पोलीस घेत आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

अंबरनाथमध्ये विचित्र अपघाताचा थरार! पेटत्या ट्रकनं कार, रिक्षाला चिरडलं, होरपळून रिक्षातील दोघांचा मृत्यू

<a href="https://ift.tt/3KpeVPN कोठडीत पोलिसांनी मारहाण आणि अनैसर्गिक अत्याचार केल्याचा व्यापाऱ्याचा आरोप; अकोल्यातील धक्कादायक घटना

नात्याला काळीमा फासणारी घटना! अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी नराधम पिता-पुत्राला अटक

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी एबीपी माझा लाईव्ह पाहा

source https://marathi.abplive.com/crime/sangli-crime-news-demanded-ransom-of-rs-20-lakh-for-threatening-to-make-pornographic-photo-of-young-woman-on-social-viral-at-miraj-maharashtra-1026915

Post a Comment

0 Comments