Badlapur : दृष्टिहीन वृद्ध महिला घराच्या छतावर अडकली, तरुणाच्या प्रसंगावधानामुळं प्राण वाचले

<p>बदलापूरजवळील वांगणी गावात ८० वर्षांची एक दृष्टिहीन वृद्ध महिला घराच्या छतावर अडकली होती. पण एका तरुणानं दाखवलेल्या प्रसंगावधानामुळं या महिलेचे प्राण वाचवण्यात यश आलं. वांगणी श्रीनगर भागात राहणाऱ्या जानकीबाई झांजे या नकळत घराच्या पहिल्या मजल्यावरुन समोरील पत्र्यावर चालत गेल्या. जानकीबाईंना नीट चालता येत नसल्यामुळं त्या बसत बसत पत्र्यावरून पुढे गेल्या. पण पुढे त्यांना जमीन लागली नाही. त्यामुळं त्या पत्र्याच्या टोकावर अडकून पडल्या. हा सर्व प्रकार घराच्या बाजूला राहणाऱ्या राहुल लोते या तरुणाने पाहिला. त्यानं प्रसंगावधान दाखवून पत्र्यावर जाऊन जानकीबाईंना सुखरुप खाली उतरवलं. ही घटना मोबाईल कॅमेऱ्यानं टिपली आहे.&nbsp;&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/blind-old-woman-trapped-on-roof-of-house-1035836

Post a Comment

0 Comments