<p><br />अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर तलवार नाचवणं भाजप नेते मोहित कंबोज यांना चांगलंच महाग पडलंय. कंबोज यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. सार्वजनिक ठिकाणी तलवार काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. तसंच लोकांची गर्दी जमवत कोविड नियमांचं उल्लंघन केल्याचाही ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आलाय. मलिक यांना ईडीनं अटक केल्यानंतर भाजप नेते मोहित कंबोज यांनी तलवार नाचवत आणि फटाके फोडत जल्लोष केला. शिवाय कंबोज यांनी तलवारही नाचवली होती. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mohit-kamboj-arrest-nawab-malik-dance-sword-1035834
0 Comments