मराठा आरक्षणासाठी आजपासून संभाजीराजेंचा एल्गार, मुंबईत आमरण उपोषण

खासदार संभाजीराजे छत्रपती हे आजपासून आमरण उपोषणाला बसणार आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं आणि त्यांच्या मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी आझाद मैदानावर संभाजीराजे उपोषण करणार आहेत. 15 फेब्रुवारीला त्यांनी पत्रकार परिषद घेतली होती. त्यामध्ये त्यांनी आमरण उपोषण करणार असल्याची माहिती दिली होती. एकटे संभाजीराजे जरी उपोषणाला बसणार असले तरी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांना मोठा पाठिंबा मिळत आहे. दरम्यान, आज 11.30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी आझाद मैदानावर पोहोचणार आहेत. त्यानंतर त्यांच्या आंदोलनाला सुरूवात होणार आहे. नेमका आजचा कार्यक्रम कसा असेल...

सकाळी 10:50 वजता मरीन ड्राईव्ह येथून सर्व समन्वयकांसह संभाजीराजे हुतात्मा चौक येथे येमार आहेत. त्यानंतर ११ वाजता हुतात्मा चौक, मुंबई येथे हुतात्मा स्मारकास अभिवादन करणार आहेत. 11:15 वाजण्याच्या दरम्यान आझाद मैदान येथे उपोषणस्थळी आगमन होणार आहे, त्यानंतर संभाजीराजे प्रसारमाध्यमांशी संवाद साधणार आहेत. 11:30 वाजता संभाजीराजे उपोषणस्थळी छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करतील, त्यानंतर उपोषणास सुरुवात होणार आहे.

महाराष्ट्र, बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नाही का?, मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं

<a href="https://ift.tt/TsCQ6g3 Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकसत्ताच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायावरुन भाजपला इशारा दिला. आता तुमची वेळ आहे. घाला धाडी, प्रत्येकाचा दिवस असतो. लक्षात ठेवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं.

Yashwant Jadhav : 24 तास उलटले तरी यशवंत जाधव यांच्या घरी छापेमारी सुरूच, शिवसैनिकांची जोरदार घोषणाबाजी

Shivsena Corporator Yashwant Jadhav : गेले 24 तास उलटून गेले तरी अद्याप शिवसेना नेते व मुंबई महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाची छापेमारी सुरूच आहे. शुक्रवारी सकाळपासून आयकर विभागाची छापेमारी सुरू झाली होती. दरम्यान, याविरोधात चिडलेल्या शिवसैनिकांनी आयकार विभागाच्या छापेमारीविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मध्यरात्री यशवंत जाधव यांना घरातून बाहेर काढल्याचे समझल्यावर शिवसैनिक मोठ्या संख्येने यशवंत जाधव यांच्या घराच्या बाहेर एकत्र आले होते.

from maharashtra https://ift.tt/XFbNYz4
via IFTTT
0 Comments