Mahashivratri : Sindhudurg : समुद्राच्या काठावरील कुणकेश्वर मंदिरात दर्शनाला भाविकांची गर्दी

<p><strong>Mahashivratri : Sindhudurg :</strong> दक्षिण कोकणची काशी अशी ख्याती असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड मधील कुणकेश्वर मंदिरात दर्शनाला भाविकांची रात्रीपासुन गर्दी सुरु झाली आहे. कुणकेश्वर मदिर पांडव कालीन पुरातन मंदिर असून याठिकाणी स्वयंभू पिंड आहे. महाशिवरात्रीच्या काळात कुणकेश्वर येथे तीन दिवस जत्रा भरते. आठ ते दहा लाख भक्तांची मांदियाळी याठिकाणी पाहायला मिळते. कुणकेश्&zwj;वराला दक्षिण कोकणची काशी असे संबोधले जाते. काशी येथे 108 शिवलिंगे आहेत तर कुणकेश्&zwj;वर येथे&nbsp; 107 शिवलिंगे आहेत. मात्र हि शिवलिंगे समुद्राच्या काठावर असल्यामुळे हि ओहोटीच्या वेळीच पाहायला मिळतात.&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mahashivratri-celebrataion-in-kunkeshwer-temple-1037034

Post a Comment

0 Comments