Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/XPpeWGb Ukraine War : युक्रेनमधील 182 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाचे विमान मुंबईत दाखल

<a href="https://ift.tt/sGmF1qS Ukraine War : युक्रेनमध्ये अडकलेल्या 182 विद्यार्थ्यांना घेऊन एअर इंडियाच्या विशेष विमान मुंबईत दाखल झाले आहे. बुखारेस्ट, रोमानिया येथील भारतीय विद्यार्थ्यांना सुरक्षित घेऊन एअर इंडियाचे विमान परतले आहे. विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी मंत्री नारायण राणे विमानतळावर पोहोचले. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना सुरक्षित मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने एअर इंडियासह ऑपरेशन गंगा हाती घेतली आहे. भारतीयांना युक्रेन घेऊन परतणारे ही सातवी फ्लाईट आहे.

युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांसाठी सरकारकडून युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. युक्रेनच्या बुखारेस्टमधून एअर इंडियाच्या आठव्या आणि नवव्या विमानानेही उड्डाण केले आहे. 218 भारतीयांसह हे विमान दिल्लीला रवाना झाले आहे. मंगळवारी पहाटे 5.30 वाजता परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी ट्विट करून 'ऑपरेशन गंगा'चे नववे उड्डाण दिल्लीला रवाना झाल्याची माहिती दिली.

<a href="https://ift.tt/PR1WroF : उत्तर भारतात थंडी कायम, तर महाराष्ट्रात तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे

Weather Update : देशाची राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांत झालेल्या पावसामुळे किमान तापमानात घट झाली आहे. त्यामुळे तिथे थंडीचा कडाका अद्याप सुरुच आहे. दरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत आज ढगाळ वातावरण राहणार आहे. तसेच जोरदार वारे वाहत असल्याने थंडीचा जोर पुन्हा वाढला आहे. दिल्लीत आज कमाल तापमान 26 अंश तर किमान तापमान 13 अंश राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात देखील तापमानात चढ उतार कायम आहे. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण देखील आहे. तर काही ठिकाणी तापमानाचा पारा 35 अंशाच्या पुढे गेला आहे. राज्यात आणखी तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. राज्यातील सांगली, सोलापूर, अकोला, परभणी या जिल्ह्यांमध्ये तापमान 35 अंशाच्या पुढे असल्याने उन्हाचा चटका वाढला आहे.

from maharashtra https://ift.tt/2S14Zhd
via IFTTT
0 Comments