<p><strong>Mahashivratri2022 : </strong> महाशिवरात्री औरंगाबादेत बारा ज्योतिर्लिंगापैकी शेवटचे असलेल्या घृष्णश्वेर मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय.. घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाची जलधारा पूर्व दिशेला असल्यानं या मंदिराला पूर्ण प्रदक्षिणा घातली जाते. महाशिवरात्रीच्यानिमित्त या ठिकाणी हजारो भाविक अगदी मध्यरात्रीपासून दाखल झालेत. कोरोनाच्या संकटानंतर अडीच वर्षानंतर पहिल्यांदाच पिंडीला स्पर्श करून भाविकांना दर्शन घेता येतं आहे. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mahashivratri-celebrataion-in-aurangabaad-gruneshwar-temple-1037042
0 Comments