Sangli Mseb Fire : शेतकरी आंदोलनाचा भडका, सांगलीत अज्ञात शेतकऱ्यांनी पेटवलं MSEB चं सब स्टेशन

Sangli Mseb Fire : शेतीसाठी दिवसा वीज द्या, या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. कोल्हापूरबरोबर आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील आक्रम झाल्याचे पाहायला मिळत आहे. आक्रमक झालेल्या अज्ञात शेतकऱ्यांनी सांगली जिल्ह्यातील सांगली- इस्लामपूर रस्त्यावरील कसबे डिग्रज येथील महावितरणचे  (MSEB) सब स्टेशन पेटवल्याची घटना घडली आहे. मध्यरात्री शेतकऱ्यांनी हे सब स्टेशन पेटवल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे.

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याने महावितरणचे सब स्टेशन पेटवल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप याबाबत सविस्तर माहिती मिळालेली नाही. कार्यालयात महत्त्वाची कागदपत्रे होती. त्या सर्व कागदपत्रासह अन्य साहित्य जळून खाक झाले आहे. दरम्यान, शेतकरी आंदोलनाचा भडका उडाल्याचे पाहायला मिळत आहे. हे आंदोलन आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या सात दिवसांपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांना शेतीसाठी दिवसा 10 तास वीज मिळावी, या मागणीसाठी कोल्हापुरातील महावितरण कार्यालयासमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरु आहे. अद्याप यावर कोणताही तोडगा निघालेला नाही. कोल्हापूरमध्ये शेतकरी आंदोलनाची धग असतनाचा आता सांगली जिल्ह्यातील शेतकरी देखील दिवसा वीज द्यावी या मागणीसाठी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. रात्री उशिरापर्यंत अग्निशमन विभागाचे कर्मचारी आग विजवण्याचे काम करत होते. पहाटेच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आले.

शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या, या मागणीसाठी कोल्हापूर येथे माजी खासादर राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची दखल अद्याप घेतली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष खदखदत आहे. त्यातूनच कसबेद डिग्रज येथील महावितरणचे कार्यालय पेटवण्यात आले. शेतकऱ्यांना दिवसा दहा तास वीज द्या, वाढीव वीज दर रद्द करा, वीज कनेक्शन तोडणी मोहीम थांबवा, वीज बिले दुरुस्त करून द्या आदीसह अन्य मागण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलन सुरू आहे. मात्र शासन दरबारी या आंदोलनाची अद्याप दखल घेतली नसल्याने कोल्हापूरसह सांगली जिल्ह्यातही आंदोलनाची तीव्रता वाढत आहे. याच प्रश्नावर सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात दहा ते बारा दिवसापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाला इशारा देण्यात आला होता. मात्र, तरीही कोणतीच कारवाई झालेली नाही, त्यामुळेच शेतकऱ्यांमध्ये संताप निर्माण झाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/YHC2TzL shetti : मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे नाही, बळीराजाचा जीव वाचवण्यासाठी दिवसा वीज द्या : राजू शेट्टी

<a href="https://ift.tt/zjADpPh shetti Agitation : एका मंत्र्याला समर्थन देण्यासाठी सगळं मंत्रीमंडळ रस्त्यावर, पण शेतकऱ्यांची चौकशी करायला वेळ नाही

<a href="https://ift.tt/jTPKIJ8 farming : पारंपरिक शेतीला बगल देत माजी सैनिकांनी यशस्वी केली जिरेनियमची शेती, मिळवतायेत लाखोंचा नफा

source https://marathi.abplive.com/agriculture/unidentified-farmers-set-fire-to-mseb-office-in-sangli-district-1036741

Post a Comment

0 Comments