फडणवीसांचा पेनड्राइव्ह बॉम्ब राज्य सरकार निकामी करणार? गृहमंत्री आज विधानसभेत देणार माहिती

Maharashtra Assembly Session : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर फेकलेला पेनड्राइव्ह बॉम्ब महाविकास आघाडी निकामी करणार की बचावात्मक भूमिका घेणार, हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील विधानसभेत आज निवेदन सादर करणार आहेत.

विधानसभेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर गंभीर आरोप केल्यानंतर बुधवारी विधीमंडळात सरकार कोणती भूमिका घेणार, याकडे लक्ष लागले होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात उपस्थित राहणार नसल्याचे कळवले होते. त्यांच्या विनंतीनुसार गुरुवारी निवदेन सादर करणार असल्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटले.

देवेंद्र फडणवीस यांचे आरोप काय?

राज्य सरकारचे विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांचे कार्यालय हे विरोधकांची कत्तल कशी करायची याचं कारस्थान शिजण्याचं मुख्य ठिकाण आहे. त्याच ठिकाणी गिरीश महाजन यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा कट रचल्याचा घणाघाती आरोप करत देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात खळबळ उडवून दिली. विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप असलेल्या व्हिडिओचा पेनड्राइव्ह फडणवीस यांनी विधानसभा अध्यक्षांकडे दिला. गिरीश महाजनांच्या विरोधात गुन्हा कसा नोंद करायचा यापासून ते बरंच काही या कार्यालयात ठरलं. एफआयआर नोंद करणे आणि खोटे साक्षीदार तयार करण्याचं काम सरकारी वकिलांनी केलं. साक्षी कशा घ्यायच्या त्यापासून पैसे कसे घ्यायचे याचा सर्व घटनाक्रम या व्हिडीओत असल्याचे त्यांनी म्हटले.

राष्ट्रवादीचा पलटवार

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध केलेल्या काही व्हिडिओ फूटेजच्या सीसीटीव्हीमधील तारीख ही 1 जानेवारी 2019 ची असल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसने फडणवीस यांच्या आरोपांवर प्रश्नचिन्ह उभे केले आहेत. राष्ट्रवादी युवक कांग्रेस कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांनी व्हिडिओची  सत्यता पडताळण्याची मागणी गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे केली आहे. व्हिडियो चा सूत्रधार कोण? डबिंग आर्टिस्ट कोण? दिग्दर्शक कोण यांची चौकशीची मागणी राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर महत्त्वाच्या बातम्या:

<a href="https://ift.tt/ed21Wrs Budget Session: विशेष सरकारी वकिलांचे कार्यालय म्हणजे विरोधकांची कत्तल करण्याचं ठिकाण; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

source https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-home-minister-dilip-walse-patil-will-give-reply-on-opposition-leader-devendra-fadnavis-allegation-in-maharashtra-assembly-1039804

Post a Comment

0 Comments