<p>Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर निघालेत. परिवहनमंत्री अनिल परब ( Anil Parab ) यांचे दापोलीमधील रिसॉर्ट बेकायदेशीर असल्याचा आरोप करत ते तोडण्याचा चंग सोमय्यांनी बांधलाय. याच पार्श्वभूमीवर चलो दापोलीचा नारा सोमय्यांनी दिलाय. मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला आता अनिल परब यांचे रिसॉर्ट तोडूया असा इशारा देत चलो दापोली असे ट्विट किरीट सोमय्या यांनी केलंय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-chalo-dapoli-kirit-somiya-leaves-with-hammer-to-destroy-anil-parab-resort-in-dapoli-1044630
0 Comments