का वाढतायंत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती? मंत्री नितीन गडकरींनी सांगितलं कारण...

दिवसंदिवस देशात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत सातत्यानं वाढ होत आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला मोठा फटका बसत आहे. गेल्या पाच दिवसांत देशात चौथ्यांदा पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात 80 पैशांची वाढ झाली आहे. वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना प्रश्न विचारला असता त्यांनी याबाबत वक्तव्य केलं.

रशिया-युक्रेन युद्धामुळे तेलाच्या किंमती वाढल्या

एबीपी नेटवर्कच्या 'आयडियाज ऑफ इंडिया' या कार्यक्रमात गडकरी बोलत होते. भारतात 80 टक्के तेल आयात केले जाते. सध्या रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरु आहे. या युद्धाचा परिणाम अनेक देशांवर हहोत आहे. युद्धाच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किंमती वाढल्या असून, त्याबाबत आपण काहीही करु शकत नाही. स्वदेशी ऊर्जा निर्मितीक्षमता विकसीत करण्याच्या गरजेवर भर देत इंधन स्वतः तयार करण्याची गरज असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे.

प्रवीण दरेकरांचा अटकपूर्व जामीन मुंबई सत्र न्यायालयानं अर्ज फेटाळला

बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकांचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावला आहे. मात्र या निकालाल हायकोर्टात आव्हान देता यावं यासाठी मंगळवारपर्यंत अटकेपासून दिलेला दिलासा कायम ठेवण्यात आला आहे. डिसेंबर 2017 मध्ये नागपूर अधिवेश सुरू असताना मजूर म्हणून काम केल्याचा परतावा कसा घेतला?, साल 2017 च्या नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये काम केल्याबद्दल दरेकरांनी 25 हजार 700 रूपयांची मजूर घेतल्याची नोंद आहे. त्यामुळे एकाचवेळी दरेकर दोन्ही ठिकाणी उपलब्ध कसे होते?, त्यामुळे यात प्रथमदर्शनी खोटी माहिती देऊन फसवणूक केल्याचं कोर्टानं आपल्या निकालांत स्पष्ट केलं आहे. राज्य सरकारनं प्रवीण दरेकरांच्या याचिकेला जोरदार विरोध करत फसवणुकीच्या या प्रकरणात त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज असल्याची भूमिका घेतली होती. काही वर्षांपूर्वी मजूरी करणा-या दरेकरांकडे कोट्यावधींची मालमत्ता कशी आली?, याचीही चौकशी होणं गरजेचं असल्याचं विशेष सरकारी वकीलांनी मागणी केली होती.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-26-march-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1044635
0 Comments