<p>बुलेटीनच्या सुरुवातीला महाराष्ट्राला हादरवणारी बातमी.. देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महाविकास आघाडीचे नेते, काही पोलीस अधिकारी आणि सरकारी वकिलांवर अतिगंभीर आरोप केले आहेत. गिरीश महाजनांसह आपल्यालाही खोट्या केसमध्ये अडकवण्याचा डाव असल्याचा आरोप फडणवीसांनी केलाय.. काही नेत्यांसह सरकारी वकील प्रवीण चव्हाण आणि काही पोलीस अधिकाऱ्यांनी गिरीश महाजनांवर मोक्का लावण्याचा प्लॅन केल्याचं फडणवीस म्हणालेत. पुरावे म्हणून फडणवीसांनी एक पेनड्राईव्हच विधानसभा अध्यक्षांकडे सुपूर्द केलाय....या प्रकरणाची सीबीआयमार्फेत चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केलीय...या प्रकरणात गरज पडल्यास न्यायालयात जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय.</p> <p> भाजर </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-devendra-fadnavis-on-pen-drive-in-maharashtra-budget-2022-1039273
0 Comments