Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/ApsbBKv Diesel Rate : निवडणुका संपल्या, इंधन दरवाढ होणार? देशातील आजचे दर काय?

Petrol-Diesel Price Today 11 March 2022 : देशातील पाच राज्यांमध्ये निवडणुकांटे निकाल जाहीर झाले असून चार पैकी तीन राज्यांत भाजपनं एकहाती सत्ता मिळवली आहे. गेल्या काही महिन्यांपासून शक्यता वर्तवली जात होती की, निवडणुका संपताच देशात पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली जाऊ शकते. पण आजही देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आजही भारतीय तेल कंपन्यांनी (Oil companies) पेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या शक्यतेमागील मुख्य कारण म्हणजे, रशिया आणि युक्रेनमधील युद्धजन्य परिस्थिती. या दोन देशांतील युद्धानं संपूर्ण जगाची चिंता वाढवली आहे. असातच यामुळे कच्च्या तेलाच्या दरांनी उच्चांक गाठला आहे. त्यामुळेच, देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीची शक्यता वर्तवण्यात येत होती.

तब्बल चार महिन्यांपासून देशात इंधन दर स्थिर

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे (5 State Assembly Election) दरात वाढ झाली नसल्याचं म्हटलं जात आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होण्याची शक्यता असतानाच पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांनी 9 मार्च रोजी मोठं वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले की, इंधन दर यूपीए (UPA) सरकारनं नियंत्रणमुक्त केलं होतं आणि जेव्हा इंधन दर नियंत्रणमुक्त केले जाता, त्यावेळी त्यात मालवाहतूक शुल्क देखील जोडलं जातं.

<a href="https://ift.tt/Z1cIyRn Budget 2022 Date, Time : आज राज्याचा अर्थसंकल्प; कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष

Maharashtra Budget 2022 Date, Time : आजचा दिवस महाराष्ट्रासाठी महत्त्वाचा आहे. आज विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याचं बजेट म्हणजे, अर्थसंकल्प सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर करतील. दुपारी 2 वाजता अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पातून नेमकं कोणत्या क्षेत्राला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

महाविकास आघाडीचा तिसरा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार आज दुपारी 2 वाजता विधानसभेत सादर करणार आहेत. अर्थसंकल्पातील तरतुदी आणि अन्य योजनांबाबत चर्चा करण्यासाठी काल मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचं संकट, कर्जाचा बोझा, सरकारी तिजोरीतील खडखडाट, कर न वाढवता महसुली तूट कशी भरून काढण्याचं आव्हान अर्थमंत्र्यांपुढे असणार आहे. त्यातच जनतेलाही या अर्थसंकल्पाकडून बऱ्याच अपेक्षा असल्यानं त्यांना ते कसा आणि काय दिलासा देणार याकडेही सगळ्यांचेच लक्ष लागलेलं आहे. राज्य सरकार अर्थसंकल्पात पेट्रोल आणि डिझेलवरील कर काही प्रमाणात कमी करून राज्यातील जनतेला दिलासा सरकार देणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-11-march-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1040392

Post a Comment

0 Comments