<p><strong>Manoj Jarange Patil Mumbai Morcha Azad Maidan Live Updates: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांचं मुंबईच्या आझाद मैदानावर (Maratha Reservation Protest Azad Maidan) उपोषण सुरु आहे. आज मनोज जरांगेंच्या उपोषणाचा चौथा दिवस आहे. या आंदोलनाबाबत सरकारने अद्याप तोडगा न काढल्याने मनोज जरांगेंनी उपोषण आणखी कडक करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. आजपासून (1 सप्टेंबर) पाणी पिणं बंद करणार असल्याचं मनोज जरांगेंनी सांगितलं. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धग आणखी वाढणार असल्याचे दिसून येत आहे. तर मराठा आरक्षण प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी हालचालींना वेग आला आहे. राज्याचे मुख्यमंत्री <a title="देवेंद्र फडणवीस" href="https://ift.tt/0sVumAn" data-type="interlinkingkeywords">देवेंद्र फडणवीस</a> आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची वर्षा निवासस्थानी काल रात्री उशीरा बैठक झाली. या बैठकीत नेमकी कार्य चर्चा झाली, याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाही. </strong></p>
source https://marathi.abplive.com/news/mumbai/manoj-jarange-patil-mumbai-morcha-azad-maidan-live-updates-maratha-reservation-protest-fourth-day-csmt-devendra-fadnavis-eknath-shinde-maharashtra-goverment-manoj-jarange-patil-marathi-news-1381047
0 Comments