Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/Xh6W320 Diesel Price : देशात पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीचं सत्र सुरुच; आज पुन्हा दर कडाडले, एक लिटरसाठी किती रुपये मोजाल?

Petrol Diesel Price Today 29 March : भारतीय तेल कंपन्यांनी (IOCL) आज पुन्हा पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ केली आहे. आजचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी करण्यात आले आहेत. मंगळवारी देशात पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल (Petrol Diesel Price) कडाडलं आहे. आज पेट्रोलच्या दरांत 50 पैसे प्रति लिटर, तर डिझेलच्या दरांत 55 पैशांची वाढ झाली आहे. आजच्या दरवाढीनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोलच्या दरांत प्रति लिटर 84 पैशांची तर डिझेलच्या दरांत 74 पैशांची वाढ झाली आहे. तर दरवाढीनंतर देशाच्या राजधानीत पेट्रोल 100.21 रुपये आणि डिझेल 91.47 रुपयांवर पोहोचलं आहे.

गेल्या 7 दिवसांत तेलाच्या किमतीत झालेली ही सहावी वाढ आहे. तेल कंपन्यांनी 22 मार्चपासून (24 मार्च वगळता) पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ करणं सुरूच ठेवलं आहे. अशाप्रकारे सात दिवसांत पेट्रोल 4.40 रुपयांनी महागलं आहे. तर डिझेल 4.55 रुपयांनी महागलं आहे.

<a href="https://ift.tt/lgntNTO Ukraine Conflict : नाटोच्या सुरक्षेसाठी अमेरिकेचं मोठं पाऊल, नौदलाची सहा विमानं केली तैनात

<a href="https://ift.tt/tvPcbHz Ukraine Conflict : नाटोच्या (NATO) सुरक्षेसाठी अमेरिकेने मोठं पाऊल उचललं आहे. अमेरिकेने नौदलातील सहा विमाने नाटोसाठी तैना त करण्यातचि निर्णय घेतला आहे. यूएस संरक्षण विभाग पेंटागॉनने सांगितले आहे की, नाटो (NATO) म्हणजेच पूर्व युरोपमध्ये नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशनची सुरक्षा मजबूत करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक युद्धात तज्ज्ञ असलेली सहा नौदल विमाने तैनात करत आहेत. याशिवाय अमेरिका पूर्व युरोपमध्ये सुमारे 240 नौदल सैनिकांनाही तैनात करणार आहे.

पेंटागॉनचे प्रवक्ते जॉन किर्बी यांनी सांगितले की, वॉशिंग्टन राज्यातील नौदल तळ असलेल्या व्हिडबे बेटावर आधारित EA-18G 'ग्रॉलर' विमान सोमवारी जर्मनीतील स्पॅंगडाहलम विमानतळावर पोहोचेल. हे विमान येथे तैनात असेल. पेंटागॉनच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विमाने रशिया-युक्रेन युद्धात वापरली जाणार नाहीत.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-29-march-2022-today-sunday-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1045458
0 Comments