OBC Melava in Shegaon : ओबीसींचे राजकीय आरक्षण व इतर मागण्यांबाबत आज शेगाव येथे पश्चिम विदर्भातील ओबीसींचा सामाजिक मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल , ओबीसींचे केंद्रीय नेते हार्दिक पटेल , काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर उपस्थित राहणार आहे. हा मेळावा जरी ओबीसींचा म्हटला जात असला तरी याचं आयोजन मात्र काँग्रेसच्या नेत्यांकडूनच केलं जातं असल्याने मेळावा काँग्रेसचा की ओबीसींचा? असा प्रश्न मात्र उपस्थित केला जात आहे.

मेळावा शेगावात, मात्र ओबीसींच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना आमंत्रण नाही

शेगाव येथील ओबीसींच्या या सामाजिक महामेळाव्याला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, नाना पटोले , मंत्री यशोमती ठाकूर, हार्दिक पटेल यांच्या उपस्थितीत होणार आहे. तरी मात्र स्थानिक ओबीसी नेत्यांना मात्र या महामेळाव्यातून डावलण्यात आल्याचं चित्र आहे. जळगाव जामोद मतदार संघातील शेगावात जरी हा मेळावा होत असला तरी स्थानिक लोकप्रतिनिधी व ओबीसी नेते, भाजपाचे आमदार डॉ.संजय कुटे मात्र या ओबीसींच्या म्हटल्या जाणाऱ्या महामेळाव्यातून गायब असल्याचं चित्र आहे. हा मेळावा ओबीसींच्या मागण्यांसाठी आहे? की जिल्ह्यात काँग्रेसच खचत जात असलेलं मनोधैर्य, काँग्रेसला जिल्ह्यात सदस्य नोंदणीत मिळालेलं अपयश लपविण्यासाठी आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.

मेळाव्यात फक्त काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांचा बोलबाला

पश्चिम विदर्भातील ओबीसींचा सामाजिक महामेळावा आयोजित करून ओबीसींच्या मागण्यांसंदर्भात सरकारचं लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसचं हे शक्ती प्रदर्शन आज शेगावात होत आहे. सामाजिक मेळावा असला तरी या मेळाव्याला आता किती ओबीसी नेते, कार्यकर्ते येणार हे आज दुपारी मेळाव्यात कळेल. पण या मेळाव्यामुळे मात्र काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन होणार आहे हे नक्की.

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

हे देखील वाचा-

<a href="https://ift.tt/JbkSsKG Krishna Prakash : पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचं पुन्हा वेशांतर करुन यशस्वी स्टिंग ऑपरेशन, पण....!

नांदेड जिल्ह्यात वाळू माफियांचा माजी सरपंच पितापुत्रावर प्राणघातक हल्ला

बीडमध्ये दोन तरुणांना 20 ते 25 जणांच्या टोळक्याकडून मारहाण, शहरात दहशतीचे वातावरण

घर नावावर करण्यासाठी चक्क न्यायाधीशांच्या बनावट सही, शिक्याचा वापर; गुन्हा दाखल

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/obc-maha-melava-in-shegaon-buldhana-today-presence-of-chief-minister-of-chhattisgarh-bhupesh-baghel-hardik-patel-nana-patole-1045139
0 Comments