Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/Ky8695Q Ukraine : अमेरिकेकडून रशियावर इंधन आयात निर्बंध; जगभरात उडणार महागाईचा भडका?

Russia Ukraine War : युक्रेनवर हल्ला केल्यानंतर अमेरिकेने रशियाची आर्थिक कोंडी करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत. अमेरिकेने आधीच निर्बंध लावले लागू होते. त्यात आता मंगळवारी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी रशियाच्या गॅस, कच्च्या तेलाच्या आयातींवर बंदी घालण्याची घोषणा केली. या निर्बंधामुळे रशियाला मोठा आर्थिक झटका बसेल असे म्हटले. मात्र, बायडन यांच्या या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरावर काय परिणाम होतील, याची चर्चा सुरू झाली आहे.

कच्च्या तेलाचे दर वाढणार?

अमेरिकेकडून रशियाच्या तेल आयातीवर बंदी घातल्याचा परिणाम दरांवर होण्याची भीती आहे. रशिया हा जगभरात कच्च्या तेलाचा पुरवठा करणाऱ्या देशापैकी एक आहे. जगभरात दररोज कच्च्या तेलाच्या 10 बॅरलचा पुरवठा होत असेल तर, त्यापैकी एक बॅरल रशियातील आहे. रशियाच्या उपपंतप्रधानांनी कच्च्या तेलाचे दर 300 डॉलर प्रति बॅरल इतकी होण्याचा अंदाज वर्तवला होता.

<a href="https://ift.tt/4mxlp9d Price : काल दरवाढ टळली, आजचं काय? जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधन दर

Petrol-Diesel Price Today 9 March 2022 : सरकारी तेल कंपन्यांनी (oil companies) पेट्रोल-डिझेलचे (Petrol-Diesel) आजचे दर जारी केले आहेत. आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती बदललेल्या नाहीत. दोन दिवसांपूर्वी सर्व पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकींच्या सर्व टप्प्यातील मतदान संपलं. त्यामुळे आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये मोठी वाढ होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र, आजही देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर आहेत. मात्र नागपुरात सीएनजीच्या (CNG) किमतीत मात्र मोठी वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ (Petrol-Diesel Price) होण्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे देशभरात खळबळ उडाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही. उत्तर प्रदेश, पंजाबसह 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांमुळे ( 5 State assembly election) दरात वाढ झाली नसल्याचं मानलं जात आहे.

from maharashtra https://ift.tt/jrzIWw7
via IFTTT
0 Comments