Maharashtra Breaking News LIVE Updates : राज्यभरातील ताज्या अपडेट्स जाणून घ्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

<a href="https://ift.tt/CnsZ8SJ Raut Press Conferance : तीच वेळ, तेच स्थळ, टार्गेटवर कोण? संजय राऊतांची आज दुपारी 4 वाजता पुन्हा पत्रकार परिषद

Sanjay Raut Press Conferance : शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज पत्रकार परिषद घेणार आहेत. आज दुपारी 4 वाजता शिवसेना भवनात (Shiv Sena Bhavan) ही पत्रकार परिषद होणार आहे. याआधीही संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजप नेत्यांवर आरोप केला होता. तसेच, भाजप नेत्यांकडून केंद्रीय यंत्रणांचा होणाऱ्या गैरवापरावरही संजय राऊतांनी बोट ठेवलं होतं. मागच्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या (Kirit Somaiya) आणि नील सोमय्यांना (Neil Somaiya) तुरुंगात टाकणार असल्याचंही राऊत म्हणाले होते. तसेच मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरही राऊतांनी गंभीर आरोप केले होते. त्यामुळे आजच्या पत्रकार परिषदेत राऊतांच्या निशाण्यावर कोण असणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी स्वतः ट्वीट करुन पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती दिली. याआधी राऊतांनी 15 फेब्रुवारीला शिवसेना भवनात दुपारी चार वाजता पत्रकार परिषद घेत भाजपसह केंद्रीय यंत्रणांवर गंभीर आरोप केले होते. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेत त्यांच्या निशाण्यावर भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या होते. तसेच, पत्रकार परिषदेनंतर जेव्हा-जेव्हा संजय राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला, त्या-त्या वेळी त्यांनी किरीट सोमय्या आणि त्यांचे पुत्र निल सोमय्या यांच्यावर निशाणा साधला. एवढंच नाहीतर, लवकरच हे पिता-पुत्र तुरुंगात जाणार असल्याचा दावाही संजय राऊतांनी वारंवार केला आहे. त्यामुळं आता आज ते कोणता बॉम्ब फोडणार? कोणते नेते त्यांच्या निशाण्यावर असणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.

<a href="https://ift.tt/0WkwUnR Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धाचा 13 वा दिवस; तिसऱ्या फेरीतील चर्चाही निष्फळ

Russia Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये मागील 13 दिवस युद्ध सुरू आहे. रशियाने केलेल्या हल्ल्याला युक्रेनकडून कडवा प्रतिकार सुरू आहे. एका बाजूला युद्ध सुरू असताना दुसरीकडे दोन्ही देशांकडून शांतता चर्चा सुरू आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये झालेली तिसऱ्या फेरीतील चर्चा निष्फळ ठरली आहे.

रशिया आणि युक्रेन दरम्यान तिसऱ्या फेरीतील चर्चा बेलारूसच्या सीमेवर झाली. युक्रेनच्या शिष्टमंडळातील सदस्य पोडोलीक यांनी सांगितले की, परिस्थितीत सुधारणा होईल, काही ठोस निर्णय घेतला जाईल अशी चर्चा झाली नाही. मात्र, युद्धबंदी आणि सुरक्षेच्या हमीसह इतर मुद्यांवर चर्चा सुरूच  राहणार आहे. तर, रशियन शिष्टमंडळाचे प्रमुख मेडिंस्की यांनी सांगितले की, युक्रेनसोबत झालेल्या चर्चेत आमच्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत. राजकीय आणि लष्करी मुद्यावर चर्चा सुरू आहे. लवकरच काही सकारात्मक निर्णय होईल असे म्हणणे चुकीचे ठरेल असे त्यांनी म्हटले.

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-marathi-news-breaking-news-live-updates-08-march-2022-today-marathi-headlines-maharashtra-political-news-mumbai-news-national-politics-news-1038992

Post a Comment

0 Comments