<p><br />आयपीएलसाठी मुंबई पोलिसांनी फारच उदारपणा दाखवलाय.. मागची थकबाकी वसूल न करता मुंबई पोलिसांनी पुन्हा आयपीएल क्रिकेट सामन्यांसाठी सुरक्षा पुरवलीय.. मुंबई क्रिकेट एसोशिएशनने मुंबई पोलिसांचे 14 कोटी 82 लाख रुपये थकवले आहेत. विशेष म्हणजे थकबाकीच्या वसुलीसाठी पाठवलेल्या 35 स्मरण पत्रांनाही एमसीएने केराची टोपली दाखवलीय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मुंबई पोलिसांनी ही माहिती दिलीय.. आयपीएलचे बहुतेक सामने मुंबई, नवी मुंबईतील मैदानांमध्ये पार पडणार आहे.. </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-mumbai-police-generous-security-provided-for-recovery-of-arrears-for-ipl-1044901
0 Comments