IPL मध्ये 15 व्या हंगामाची सुरुवात कोलकाता संघाने विजयाने, कोलकाताने केला चेन्नईचा पराभव : ABP Majha

<p>आयपीएलच्या 15 व्या हंगामाची सुरुवात कोलकाता संघाने विजयाने केली आहे. चेन्नईनं दिलेले 132 धावांचे आव्हान कोलकाता संघाने चार गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले आहे. उमेश यादवची भेदक गोलंदाजी त्यानंतर अजिंक्य रहाणे, सॅम बिलिंग्स आणि नितेश राणा यांनी केलेल्या छोटेखानी खेळीच्या बळावर कोलकाताने चेन्नईचा पराभव केला. &nbsp;अजिंक्य रहानेने सर्वाधिक ३४ चेंडूत ४४ धावा केल्य़ा.. चेन्नईकडून एम.एस. धोनीने अर्धशतकी खेळी केलीय.. धोनीने 38 चेंडूत 50 धावा करत चेन्नईला 131 धावांचा पल्ला गाठून दिला.. मात्र कोलकाताने सांघिक कामगिरीच्या</p> <p>&nbsp;</p> <p>जोरावर पहिल्या विजयाची नोंद केलीय..&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-kolkata-started-the-the-ipl-with-a-victory-kolkata-defeated-chennai-1044900

Post a Comment

0 Comments