Petrol-Diesel Price : देशातील सर्वात महाग पेट्रोल मिळतंय महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यात; जाणून घ्या तुमच्या शहरांतील दर

Petrol-Diesel Price Hike : देशात महागाईनं हैराण केलं आहे. पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर पेट्रोल-डिझेलच्या (Petrol-Diesel) किमतींमध्ये वाढ होणार असल्याचं सांगितलं जात होतं. याच पार्श्वभूमीवर देशात पेट्रोल-डिझेलच्या दरांमधील वाढीचं सत्र सुरु झालं आहे. देशात आज सलग सहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये वाढ झाली आहे. नव्या दरांनुसार, डिझेल पुन्हा एकदा 57 पैशांनी महागलं आहे. तर पेट्रोलमध्ये प्रति लिटर 52 पैशांची वाढ करण्यात आली आहे. सहा दिवसांतील पेट्रोल-डिझेलच्या दरातील ही पाचवी वाढ आहे. आज सकाळी सहा वाजल्यापासून देशभरात हे नवे दर लागू झाले आहेत.

नव्या दरांनुसार, देशाची आर्थिक राजधानी मुंबईत (Mumbai) पेट्रोल 113 रुपये 88 पैशांवर पोहोचलं आहे. हे देशातील सर्वाधिक दर आहेत. तर डिझेलचे दर 98 रुपये 13 पैशांवर पोहोचले आहेत. मुंबईत पेट्रोलच्या किमतींमध्ये 84 पैसे आणि डिझेलच्या किमतींमध्ये 85 पैशांची वाढ झाली आहे. तर देशाच्या राजधानीचं शहर असलेल्या दिल्लीमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 99 रुपये 11 पैसे आणि एक लिटर डिझेल 90 रुपये 42 पैसे वर पोहोचलं आहे. काल राजधानीत 80 रुपयांची वाढ झाली होती.

राज्यातही पेट्रोल-डिझेलच्या दरांत वाढ झाली आहे. परभणीत देशातील सर्वाधिक दर आहेत. परभणीत पेट्रोल116.56 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 99.26 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तसेच, मुंबईत आज पेट्रोल 113.88 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. तर डिझेल 98.13 रुपये प्रति लिटरनं विकलं जात आहे. जाणून घेऊया राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?

राज्यातील महत्त्वाच्या शहरांतील दर काय?

शहरं

पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)

डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई (Mumbai)

113.88

98.13

पुणे (Pune)

112.87

96.41

नाशिक (Nashik)

114.12

96.91

परभणी (Parbhani)

116.56

99.26

सोलापूर (Solapur)

113.94

96.75

नागपूर (Nagpur)

113.75

96.59

देशातील महानगरांतील दर जाणून घ्या

शहरं

पेट्रोलच्या किमती (प्रति लिटर)

डिझेलच्या किमती (प्रति लिटर)

मुंबई

113.88

98.13

दिल्ली

99.11

90.42

चेन्नई

104.90

94.47

कोलकाता

108.53

95.00

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत).

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-petrol-diesel-price-hike-highest-petrol-and-diesel-rates-in-parbhani-know-rates-in-other-cities-in-state-1044897

Post a Comment

0 Comments