BMC Election 2022 : महापालिका निवडणूकीच्या (Municipal Corporation Elections) तोंडावर शिवसेनेचा (Shivsena) नवा उपक्रम येत्या १ जूनपासून सुरु होणार आहे. यानिमित्त मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी 'शिव योगा' सेंटर सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी मिळणार योगाचे धडे
मुंबईकरांच्या सुदृढ आरोग्यासाठी आता शिव योगा सेंटर सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 1 जूनपासून सुरु होणाऱ्या शिव योगा सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांना योगाचे धडे देण्यात येणार आहेत. योगाचे धडे घेण्यासाठी किमान 30 जणांचा ग्रुप गरजेचा असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून योगाचे धडे दिले जाणार जातील. दरम्यान, योगाचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षकाला दोन तासांचे एक हजार रुपये देण्यात मानधन देण्यात येणार आहे..

खाजगी सोसायट्यांत योगा सेंटर
मुंबईत अनेक सोसायट्या असून सोसायटीत जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी योगाचे धडे दिले जाणार आहेत. परंतु किमान 30 जाणांचा समुह असणे गरजेचे आहे.

तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षकांची निवड
या उपक्रमासाठी पालिकेकडून तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षकांची निवड करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेची निवड अंतिम करताना आयुष मंत्रालयाचा सल्लाही घेतला जाणार आहे. प्रत्यक्षात उपक्रम राबवणार्‍या संस्थेची पात्रता निश्चित करताना मान्यताही तपासली जाणार आहे.

अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद
मुंबईत एकूण 200 ‘शिव योग’ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात 100 केंद्रे सुरू करण्यात येतील. या आर्थिक वर्षासाठी 25 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. 'शिव योग' केंद्रांवर प्रत्यक्ष सूचना देणे आणि लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षकांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. मुंबईत एकूण 200 'शिवयोग' केंद्रे सुरू केली जाणार आहेत.

महत्वाच्या इतर बातम्या

Mega Block : मुंबईत शनिवारी, रविवारी मध्य मार्गावर मेगा ब्लॉक, पाहा संपूर्ण वेळापत्रक

Sharad Pawar : राज्यातील ब्राह्मण संघटनांना पवारांचं चर्चेचं निमंत्रण, आनंद दवेंच्या संघटनेसह काही संघटनांचा विरोध

Sanjay Raut : शिवसेनेकडून सलग चौथ्यांदा संजय राऊत राज्यसभेवर, 26 मे रोजी दाखल करणार उमेदवारी अर्ज

source https://marathi.abplive.com/news/mumbai/maharashtra-marathi-news-shivsena-new-venture-ahead-of-municipal-elections-mumbaikars-will-get-yoga-lessons-1061569
0 Comments