<p>बारावीचं वर्ष हा शैक्षणिक आयुष्यातला महत्वाचा टप्पा... मात्र या बारावीकडे दुर्लक्ष करण्याचा आता अजिबात विचार करू नका... कारण सीईटी परीक्षेसाठी पुढील शैक्षणिक वर्षापासून बारावीचे ५० टक्के गुण आणि सीईटीचे ५० टक्के गुण एकत्रित करुन विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहेत. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही माहिती दिली. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान, पुढील वर्षापासून मात्र कोणत्याही परिस्थितीत १ जुलैपर्यत सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू करणार, असंही सामंत यांनी म्हटलंय. </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-cet-hsc-exam-equal-judgment-of-cet-and-hsc-marks-in-the-next-academic-year-1065094
0 Comments