Monsoon 2022 : पावसाळ्याआधी 7 जिल्ह्यात NDRF ची पथकं तैनात करणार ABP Majha

<p>पुढील काही दिवसातच मान्सून राज्याच्या वेशीवर दाखल होईल... तत्पूर्वी राज्य सरकारनं पावसाळ्यासाठी तयारी सुरू केलेय..... महापूर आणि दरडीच्या घटना टाळण्यासाठी आणि वेळेत मदत पोहोचावी यासाठी राज्य़ सरकारनं एक मोठी घोषणा केलीए... १५ जूनपासून राज्यातल्या ७ जिल्ह्यात एनडीआरएफच्या ९ टीम्स दाखल होणार आहेत... शिवाय अधिकाऱ्यांनाही विशेष सूचना देण्यात आल्यात.. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत &nbsp;कोस्टल गार्ड, वायूदल, नौदल, एनडीआरएफ, आणि एसडीआरएफसोबत बैठक पार पडली.,..या बैठकीत विशेष सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या पावसाऱ्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वेळेत मदत न पोहोचल्यानं अनेक नागरिकांनी प्राण गमावले होते. त्यावरून धडा घेत राज्य सरकारनं सावधगिरीचं पाऊल उचललं आहे.</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-monsoon-2022-ndrf-squads-will-be-deployed-in-7-districts-in-maharashtra-1065096

Post a Comment

0 Comments