<p>पुढील काही दिवसातच राज्यात मान्सूनचं आगमन होईल.. मात्र तत्पूर्वी राज्यातल्या अनेक जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत... काल नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस बरसला. नांदेड शहरातील सिडको परिसरात वादळी वाऱ्यामुळे रिक्षावर झाड कोसळलं आहे. तिकडे हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाल्यानं उकाड्याने त्रस्त असणाऱ्या हिंगोलीकरांना पावसामुळे दिलासा मिळाला आहे.. तर पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. सोलापूरच्या बार्शी शहर आणि परिसरातही तुफान वाऱ्यासह पावसाच्या सरी कोसळल्या. तर यवतमाळमध्ये विजेच्या कडकडासह वादळी वाऱ्यासह काल जोरदार ऊस झालाय.</p>
source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-monsoon-2022-heavy-showers-of-pre-monsoon-rains-in-many-districts-of-maharashtra-1065097
0 Comments