Ahmednagar Puntamba : पुणतांबामध्ये पुन्हा एकदा पाच दिवसांसाठी शेतकऱ्याचं धरणं आंदोलन ABP Majha

<p>२०१७मध्ये ऐतिहासिक शेतकरी आंदोलन करणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांब्यात आजपासून पुन्हा आंदोलनाला सुरुवात होणार आहे. राज्यातील शेतकऱ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावं लागतंय. शेतात ऊसाचं पीक उभं आहे. कांद्याला योग्य भाव मिळत नाही. तर द्राक्ष आणि टरबूज फेकून देण्याची वेळ ओढावली आहे. तर, वीजेच्या संकटानेही शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे आंदोलनाचं हत्यार उगारत असल्याचं पुणतांब्यातील शेतकऱ्यांकडून सांगण्यात आलंय. आजपासून ५ जूनपर्यंत पुणतांब्यातील शेतकरी गावात धरणे आंदोलन करणार आहेत. यामध्ये आंदोलनात राज्यभरातले शेतकरी सहभागी होणार आहेत. ५ जूनपर्यंत सरकारने शेतकऱ्यांच्या समस्यांची दखल न घेतल्यास आणखी तीव्र आंदोलन करु, असा इशारा पुणतांब्यातील शेतकऱ्यांनी दिलाय...</p> <p>&nbsp;</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-ahmednagar-puntamba-farmers-protest-abp-majha-1065099

Post a Comment

0 Comments