<p>दुसरीकडे भाजप नेते मोहित कंबोज आर्थिक गुन्हे शाखेच्या रडारवर आहेत. कंबोज यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कर्ज बुडवल्याप्रकरणी कंबोज यांच्याविरोधात आर्थिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आलेय... कंबोज यांच्या कंपनीने २०११ ते २०१५ या कालावधीत इंडियन ओव्हरसिज बँकेकडून ५२ कोटी रुपयाचे कर्ज घेतले होते. पण ते कर्ज ज्या कारणासाठी घेतले होते, त्यासाठी त्याचा न वापर करता ती रक्कम इतर ठिकाणी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर ते कर्ज बुडवल्याचीही माहिती आहे... त्यामुळे कंबोज यांच्यावर फसवणूक आणि कट रचल्याच्या आरोपांखाली हा गुन्हा कंबोज आणि त्यांच्या कंपनीच्या दोन संचालकांविरोधात दाखल करण्यात आलाय... मोहीत कंबोज यांनी ट्वीट करत हे सर्व आरोप फेटाळले आहेत... </p> <p> </p> <p> </p>
source https://marathi.abplive.com/videos/news/mumbai-bjp-leader-mohit-kamboj-case-registered-against-1065105
0 Comments