Maharashtra Breaking News LIVE Updates : देश-विदेशातील महत्वाच्या बातम्यांचे अपडेट्स फक्त एका क्लिकवर...

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राज ठाकरेंवर अटकेची टांगती तलवार

लाऊडस्पीकरवरून अल्टिमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणी वाढल्या आहेत. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. एकीकडे सांगली न्यायालयाने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. तर दुसरीकडे औरंगाबादमध्येही त्यांच्यासह सभेच्या आयोजकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

औरंगाबाद पोलिसांनी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल केला

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी 4 मे पासून मशिदींवर लावलेले भोंगे खाली उतरवण्यासाठी राज्य सरकारला अल्टिमेटम दिले आहे. यानंतर मंगळवारी औरंगाबाद पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. सिटी चौक पोलिसांनी राज ठाकरे यांच्यावर आयपीसी कलम 153 (दंगल घडवण्यासाठी प्रवृत्त करणे), 116 (तुरुंगवासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि 117 (सार्वजनिक किंवा 10 पेक्षा जास्त व्यक्तींना गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणे) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 च्या कलम 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. अशी माहिती सिटी चौक पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिली. याबाबत माहिती देताना महाराष्ट्राचे डीजीपी रजनीश सेठ यांनी सांगितले की, औरंगाबादचे पोलीस आयुक्त राज ठाकरे यांनी मशिदींतील लाऊडस्पीकरबाबत केलेल्या भाषणाबद्दल योग्य कायदेशीर कारवाई करतील.

राज ठाकरे अटकपूर्व जामीन याचिका दाखल करणार?

औरंगाबादमध्ये नोंदवलेल्या एफआयआर प्रकरणी राज ठाकरे हे आपल्या वकिलांची टीमशी चर्चा करतील आणि त्यानंतर अटकपूर्व जामीन याचिका दाखल करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकतात.

राज ठाकरे यांच्याविरोधात 14 वर्षे जुन्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी

महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील एका न्यायालयाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरुद्ध 14 वर्षे जुन्या एका प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. 2008 मध्ये, प्रक्षोभक भाषण केल्याच्या आरोपाखाली राज ठाकरे यांच्यावर आयपीसीच्या कलम 109 आणि 117 (गुन्हाला प्रोत्साहन) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. 6 एप्रिल रोजी अजामीनपात्र वॉरंट जारी करून सांगली जिल्ह्यातील शिराळा येथील न्यायदंडाधिकारी (प्रथम वर्ग) यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना मनसे प्रमुखाला अटक करून न्यायालयात हजर करण्याचे निर्देश दिले होते. सहाय्यक सरकारी वकील ज्योती पाटील यांनी सांगितले की, न्यायमूर्तींनी राज ठाकरे आणि दुसरे मनसे नेते शिरीष पारकर यांच्याविरुद्ध अनुक्रमे मुंबई पोलिस आयुक्त आणि खेरवाडी पोलिस ठाण्यात वॉरंट जारी केले होते. कारण ते खटल्याच्या सुनावणीदरम्यान न्यायालयात हजर राहिले नाही. पाटील यांच्या म्हणण्यानुसार, न्यायालयाने पोलिसांना 8 जूनपूर्वी वॉरंट बजावण्याचे आणि दोन्ही नेत्यांना त्यांच्यासमोर हजर करण्याचे निर्देश दिले आहेत.

पालिकेची टीम आज राणा दाम्पत्याच्या खार येथील घराची पाहणी करणार

हनुमान चालिसा वादात अटक करण्यात आलेल्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे आमदार पती रवी राणा यांना बीएमसीने नोटीस बजावली आहे. बीएमसीने दिलेल्या नोटीसनुसार, मुंबई बीएमसी खारच्या इमारतीत असलेल्या रवी राणा यांच्या घराची पाहणी करणार आहे. प्रत्यक्षात घराच्या आराखड्यात छेडछाड करून बेकायदा बांधकाम केल्याचा बीएमसीला संशय आहे. अशा स्थितीत अति बांधकाम आणि काही नियमांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारीवरून बीएमसीने ही तपासणी नोटीस दिली आहे.

आरसीबी-चेन्नईकडे हरवण्याचा पर्यायच नाही

आयपीएल 2022 मध्ये बुधवारी चेन्नई सुपर किंग्ज संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी भिडणार आहे. चेन्नई सुपर किंग्जला आपल्या कमकुवत गोलंदाजीत सुधारणा करावी लागणार आहे. दुसरीकडे, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला विजय मिळवायचा असेल तर त्याला आपल्या खराब फलंदाजीत सुधारणा करावी लागेल. दोन्ही संघ खराब फॉर्मशी झुंजत आहेत. चेन्नईच्या प्लेऑफच्या आशा काहीशा अबाधित आहेत. त्यांना कायम ठेवण्यासाठी संघाला हा सामना कोणत्याही किंमतीवर जिंकावाच लागेल. त्याचबरोबर फाफ डू प्लेसिसच्या  (Faf du Plessis)  नेतृत्वाखालील आरसीबीसाठीही हा सामना खूप महत्त्वाचा आहे.

from maharashtra https://ift.tt/lCkcRQY
via IFTTT

Post a Comment

0 Comments