१. पुण्यातील बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना अटक, डीएचएफएल गैरव्यवहारप्रकरणी सीबीआयची कारवाई

२. परिवहनमंत्री अनिल परबांची ईडीकडून 13 तास झाडाझडती, चौकशीनंतर परब मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, केंद्रीय पर्यावरण विभागाकडून खोटा गुन्हा दाखल, परबांचा दावा

३. राज्यसभा उमेदवारीबाबत शिवसेनेची ऑफर नाकारल्यानंतर संभाजीराजे छत्रपती यांची आज महत्त्वाची पत्रकार परिषद, मराठा क्रांती मोर्चाचे राज्यभरातील समन्वयक उपस्थित राहणार

४. गुजरातच्या मुंद्रा बंदरावर 500 कोटींचं 52 किलो कोकेन जप्त, मीठ म्हणून इराणमधून आणलेल्या ड्रग्सवर डीआरआयची कारवाई

५. ज्ञानवापीनंतर अजमेर दर्गा हिंदू मंदिर असल्याचा दावा, महाराणा प्रताप सेनेच्या अध्यक्षांचं राजस्थानचे मुख्यमंत्री गहलोत यांना पत्र, पुरातत्व सर्वेक्षणाची मागणी.

६.महाराष्ट्रातील विविध विद्यापीठांतील विद्यार्थ्यांची उच्च न्यायालयात धाव; परीक्षेच्या पद्धतीत एकसमानतेसाठी याचिका दाखल

७. मान्सून आज केरळमध्ये दाखल होण्याचा हवामान खात्याचा अंदाज, नियोजित वेळेपेक्षा 5 दिवस आधी पोहोचण्याची शक्यता, मुंबई उपनगरात मान्सूनपूर्व सरी

८. आसाममध्ये साडेपाच लाखाहून अधिक नागरिकांना पुराचा फटका, केंद्र सरकारकडून 324 कोटींची मदत जाहीर

Assam Flood : आसाममध्ये पुरामुळे परस्थिती गंभीर झाली आहे. पुराच्या पाण्यामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. राज्यातील सात जिल्ह्यांमधील 5.61 लाखांहून अधिक लोकांना पुराच्या पाण्याचा फटका बसला आहे. पूर परिस्थितीला तोंड देण्यासाठी केंद्र सरकारने 324 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या (ASDMA) माहितीनुसार आत्तापर्यंत या परिस्थितीमुळे 30 जमांचा मृत्यू झाला आहे. गुरुवारी पुरामुळे एका मुलासह आणखी दोन लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. याबाबत माहिती देताना आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा ((Himanta Biswa Sarma) म्हणाले की, आसामच्या सध्याच्या पूरपरिस्थितीला तोंड देण्यासाठी सरकारने 324 कोटी रुपयांची आगाऊ रक्कम जारी केली आहे. याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांचा आभारी आहे. या मदतीमुळे बाधित नागरिकांचे वेळेवर मदत आणि पुनर्वसन सुनिश्चित होईल असे सरमा म्हणाले.

९. महाराष्ट्रातल्या प्रश्नावर एबीपी माझावर आज दिवसभर महाचर्चा, सकाळी 10 पासून दिग्गज नेते आणि मंत्र्यांच्या उपस्थितीत विश्लेषण

१०. काश्मीरमध्ये टीव्ही अभिनेत्रीची हत्या करणारे दोन्ही दहशतवादी ठार; सुरक्षा दलांची कारवाई

source https://marathi.abplive.com/news/maharashtra/top-10-maharashtra-marathi-news-maharashtra-news-smart-bulletin-27-may-2022-1063466
0 Comments