Crime News : जमीन वाटून का देत नाहीत? म्हणून वयोवृद्ध वडिलांवर पोटच्या मुलानेच प्राणघातक हल्ला करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना बीडच्या तालखेड गावात घडली आहे.

"मी वडिलांच्या डोक्यात दगड घातला आहे" मुलाने दिली कबुली

तालखेड गावचे शाहू पिराजी शिंदे हे नेहमीप्रमाणे सकाळी आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी गेले असता त्यांचा सर्वात लहान मुलगा संतोष शिंदे हात त्यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने शेतात आला आणि त्यांना आपल्या वडिलांच्या डोक्यात स्टीलची बकेट आणि दगड मारून त्यांना गंभीर जखमी केलं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या बापाला तिथेच ठेवून तो घरी परत आला आणि मी वडिलांच्या डोक्यात दगड घातला आहे. तो जिवंत आहे की मेलाय ते बघ अस आपल्या आईला सांगितलं

घाबरलेल्या पत्नीने थेट शेत गाठलं

हे ऐकून घाबरलेल्या राजूबाई शिंदे यांनी आपल्या नातवाला सोबत घेऊन थेट आपल शेत गाठलं आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पतीला ग्रामस्थांच्या मदतीने बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं, मात्र त्यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांना पुढील उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

जमीन वाटून घेण्यावरून सतत वडिलांसोबत वाद

शाहू शिंदे यांना चार मुले असून चौघेही कामानिमित्त मुंबई मध्ये राहतात. त्यापैकी सर्वात लहान असणारा संतोष मागील आठवड्यात मुंबईहून गावाकडे आला होता आणि जमीन वाटून घेण्यावरून सतत आपल्या वडिलांसोबत वाद घालत होता. जमीन वाटून न दिल्याच्या रागातूनच संतोषने आपल्या वृद्ध वडिलांवर प्राणघातक हल्ला केला आहे. या प्रकरणी राजूबाई शिंदे यांच्या फिर्यादीवरून माजलगाव पोलिस ठाण्यात संतोष विरोधात कलम 307 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

इतर महत्वाच्या बातम्या

Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती

<a href="https://ift.tt/kB1yq8m आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले

<a href="https://ift.tt/b15uaQ3 News : फरार आरोपीचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात आरोपी जखमी; लातूरमध्ये मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार

source https://marathi.abplive.com/crime/maharashtra-beed-crime-news-son-attempt-to-kill-father-over-land-dispute-1067376
0 Comments