Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'चा पर्दाफाश, सलग चौथ्यांदा झाडाझडती, आजपर्यंतचा ऐवज 20 कोटींच्या आसपास
Dhule Crime News : अवैध सावकारी करणाऱ्या धुळे शहरातील राजेंद्र बंब याच्या विरोधात धुळे शहरातील आझादनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस यंत्रणेने मोठ्या प्रमाणावर तपास सुरू केला आहे. काल मंगळवारी सलग चौथ्यांदा केलेल्या कारवाईत शहरातील विविध पतसंस्थांमध्ये असलेला ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे.
सुमारे 20 कोटी रूपये जप्त
धुळे शहरातील (Dhule City)नामांकित एलआयसी किंग म्हणून ओळख असलेल्या अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विविध बँकेतील खात्याची आर्थिक गुन्हे शाखेने तपासणी केली. काल मंगळवारी सलग चौथ्यांदा केलेल्या कारवाईत शहरातील विविध पतसंस्थांमध्ये असलेला ऐवज पोलिसांच्या हाती लागला असून यात 210 सौदा पावत्या, चार ते पाच विदेशी चलन, 2 कोटी 47 लाख रुपयांची रोख रक्कम तसेच 34 सोन्याचे कॉइन प्रत्येकी वजन चार ग्रॅम, तसेच जवळपास 2 हजार 400 फिक्स डिपॉझिट च्या पावत्या ज्यांची अंदाजे रक्कम दोन ते अडीच कोटी रुपये आहे असा सुमारे 4.5 कोटी रुपयांचा ऐवज पोलिसांच्या हाती लागला आहे आत्तापर्यंत सुमारे वीस कोटी रूपये पोलिसांनी यात जप्त केले असून या सर्व मालमत्तांची चौकशी पोलिस यंत्रणेकडून करण्यात येणार आहे तसेच विविध जिल्ह्यात देखील आणखी काही मुद्देमाल असण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून त्याचा देखील तपास केला जाणार आहे. नागरिकांनी अवैध सावकारी विरोधात तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी केले आहे.
योगेश्वर पतसंस्थेतील लॉकरची तपासणी, 20 कोटींच्या आसपास ऐवज सापडले
तपासणीत 2.47 कोटी रोख रक्कम, 6 लाखांची नाणी. विविध लोकांच्या नावाने ठेवलेल्या 2400 मुदत ठेवी, त्यांची किंमत अंदाजे 2 कोटीहून अधिक आहे. तसेच 100 कोरे चेक सापडले.  सापडलेला एकूण ऐवज 4.5 कोटी असून आजपर्यंतचा ऐवज 20 कोटींच्या आसपास असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
शुक्रवारी पाच लॉकर तपासले, कोट्यवधी रुपयांच्या नोटा हाती लागल्या
धुळे शहरातील (Dhule City)नामांकित एलआयसी किंग म्हणून ओळख असलेल्या अवैध सावकार राजेंद्र बंब याच्या विविध बँकेतील खात्याची आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी 3 जून रोजी तपासणी केली. त्याच्याकडे तब्बल दहा कोटी 72 लाख रुपयांचे घबाड पोलिसांच्या हाती लागले आहे. यामध्ये विदेशी चलनही पोलिसांच्या हाती लागले असून तपास यंत्रणांनी एका बँकेत सहापैकी पाच लॉकर तपासले. त्यात कोट्यवधी रुपयांच्या नोटा पोलिसांच्या हाती लागल्या आहेत.धुळे जिल्हा पोलिसांनी (Dhule Police) अवैध सावकारीच्या विरोधात कंबर कसली आहे. धुळे शहरातील राजेंद्र बंब (Rajendra Bamb) याच्या विरोधात त्यांच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने गेल्या काही दिवसांपूर्वी पोलिसांकडे अवैध सावकारी विरोधात तक्रार दाखल केली होती.  या तक्रारीची गांभीर्याने दखल घेत पोलिसांनी गेल्या तीन दिवसांपासून त्याच्या मालमत्तेची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली आहे. गेल्या तीन दिवसात सुमारे 15 कोटी रुपयांची मालमत्ता पोलिसांच्या हाती लागली असून काल केलेल्या बँकेच्या तपासणीत काही विदेशी चलनाच्या नोटा देखील पोलिसांच्या हाती लागली आहेत. राजेंद्र बंब याच्याकडे एवढी मालमत्ता असून देखील इतके दिवस आयकर विभागाचे लक्ष गेले कसे नाही असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.
मागील कारवाईत नऊ कोटी दहा लाखांची रोकड सापडली.
धुळे शहरातील मूळचा रहिवासी असणाऱ्या राजेंद्र बंब हा LICचा एजंट असून नागरिकांना कर्ज देण्याचे काम करतो मात्र कर्ज देताना त्यांच्या मालमत्तेचे कागदपत्र देखील तो स्वतः कडे घेऊन घेत असे. अनेकांनी कर्ज फिरल्यानंतर ही त्यांना त्यांच्या घराचे मूळ दस्तऐवज त्याने परत दिले नाहीत. त्याच्याकडे काम करणाऱ्या दुसाने नामक व्यक्तीने देखील राजेंद्र बंब याच्याकडून कर्ज घेतले होते. कर्ज देताना दुसाने यांच्याकडील घराचे मूळ दस्ताऐवज मागून घेतले होते. कर्ज फेडून देखील घराची मूळ कागदपत्रे देत नसल्याने दुसाने यांनी जिल्हा पोलिसांशी संपर्क साधत तक्रार दाखल केली. या प्रकरणी आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबत अधिक तपास करण्यासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे जबाबदारी देण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेने राजेंद्र बंब याच्या घराची झाडाझडती घेत तसेच त्याच्या विविध बँकांमधील खात्यांची तपासणी करण्यास सुरुवात केली. तब्बल तीन दिवस आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या झाडाझडती नऊ कोटी दहा लाखांची रोकड सापडली. असून 6 कोटी 25 लाखांचे दागिने सापडले आहेत. तसेच मालमत्तेची कागदपत्रे देखील मोठ्या प्रमाणात सापडली आहेत.
आर्थिक पिळवणूकीच्या अनेक बाबी समोर
कोण आहे राजेंद्र बंब
राजेंद्र बंब हा एलआयसी एजंट असून नागरिकांना व्याजाने कर्ज देतो. एलआयसी किंग मेकर म्हणून त्यांची जिल्ह्यात ओळख आहे. कोरोना काळात पोलीस मित्र म्हणून त्याने पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल त्याचा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांच्याकडून देखील विशेष सत्कार झाला आहे.
आयकर विभागाचे दुर्लक्ष
अवैध सावकारी विरोधात धुळे जिल्हा पोलिसांनी उचललेल्या कठोर पावला तर राजेंद्र बंब याच्यावर झालेल्या कारवाईनंतर गेल्या अनेक वर्षांपासून याकडे आयकर विभागाचे लक्ष कसे गेले नाही?असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातो आहे. या कारवाईनंतर तरी आयकर विभाग अशा पद्धतीने काम करणाऱ्यांवर कठोर कारवाई करेल का हाच महत्वाचा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.
इतर महत्वाच्या बातम्या
Dhule : धुळ्यातील 'एलआयसी किंग'कडे सापडले कोट्यवधीचे घबाड; चार दिवसांपासून झाडाझडती
<a href="https://ift.tt/kB1yq8m आर्वी पालिका कर्मचाऱ्याच्या जीवावर बेतला 'गोल्ड'चा नाद, मोपेड वाहनाला बांधून विहिरीत फेकले
<a href="https://ift.tt/b15uaQ3 News : फरार आरोपीचा हल्ला, पोलीस अधिकाऱ्याच्या गोळीबारात आरोपी जखमी; लातूरमध्ये मध्यरात्री फिल्मी स्टाइल थरार
source https://marathi.abplive.com/news/maharashtra/maharashtra-dhule-crime-news-lic-king-rajendra-bamb-raid-by-dhule-police-action-taken-around-rs-20-crore-found-1067374
Post a Comment
0 Comments