HSC Result 2022 : ऑल द बेस्ट! आज बारावीचा निकाल; दुपारी एक वाजल्यापासून ऑनलाईन रिझल्ट
HSC Result 2022 Date, Time : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल (HSC Exam Result News) कधी लागणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अशातच काल (मंगळवारी) स्वतः शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करुन माहिती दिली की, आज बारावी बोर्डाचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
बोर्डाच्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज म्हणजेच, 8 जून 2022 रोजी जाहीर करण्यात येणार आहे. आज दुपारी एक वाजल्यानंतर हा निकाल बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पाहता येणार आहे. यंदा 'एबीपी माझा'च्या संकेतस्थळावरही बारावीचा निकाल पाहता येणार आहे. यावर्षी 14 लाख 85 हजार 826 विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती. पण, यावेळी बारावीची परीक्षाच 15 दिवस उशिरानं झाल्यामुळे निकालही आठवडाभर उशिरा लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. गेल्या वर्षी कोरोना प्रादुर्भावामुळे परीक्षा झाल्या नव्हत्या. पण यंदा मात्र कोरोना आटोक्यात असल्यानं दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्या. त्यानंतर मात्र विद्यार्थी आणि पालकांना निकालाची प्रतीक्षा होती. अखेर ही प्रतिक्षा संपली असून आज दुपारी 1 वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात येणार आहे.
कुठे पाहाल निकाल?
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षेचे निकाल जाहीर होतात. बोर्डाच्या परीक्षांना सुरुवात झाल्यानंतर लगेच शिक्षक पेपर तपासणीला सुरुवात करतात. मात्र यंदा दहावी, बारावीचे सहा ते सात पेपर होऊन सुद्धा अद्याप विनाअनुदानित शिक्षकांनी एकही पेपर तपासायला घेतलेला नव्हता. त्यामुळे शिक्षकांच्या पेपर तपासणीच्या बहिष्कारामुळे दहावी आणि बारावीचे निकाल उशिरा जाहीर होणार का? असा सवालही उपस्थित झाला होता. त्यामुळे विद्यार्थी आणि पालक काळजीत होते. पण आता जून महिन्यात निकाल लागणार असल्यानं विद्यार्थी आणि पालकांची चिंता काहीशी मिटली आहे. अशातच आज बारावीचा निकाल जाहीर केला जाणार आहे.
दरम्यान, महाराष्ट्र बोर्डाचा दहावी आणि बारावीचा निकाल कोणत्या दिवशी जाहीर होणार, विद्यार्थी आणि पालकांमध्ये याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच देशातील इतर राज्यांतील दहावी, बारावीचे निकाल मात्र जाहीर करण्यात आले आहेत. अशातच, आज बारावीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे लवकरच दहावीच्या निकालाची तारीखही जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
महत्त्वाच्या इतर बातम्या :
<a href="https://ift.tt/jbpJHg5 Result 2022 Date : आज महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल, दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर होणार
<a href="https://ift.tt/ydJKbG7 Result 2022 Date : बारावी बोर्डाचा निकाल; यंदा एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल?
source https://marathi.abplive.com/education/maharashtra-board-12th-hsc-result-2022-date-time-hsc-result-2022-today-msbshse-announce-today-hsc-results-mahresult-nic-in-and-mh12-abpmajha-com-1067378
Post a Comment
0 Comments