Nupur Sharma : धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी नुपूर शर्मांविरोधात कारवाईचा बडगा ABP Majha

<p>&nbsp;भाजपमधून हाकालपट्टी करण्यात आलेल्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.... कारण पैगंबरांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यानंतर आता मुंबई पोलीस नुपूर शर्मा यांना समन्स बजावण्याच्या तयारीत आहेत. धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी हा कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. नुपूर शर्मांच्या विधानानंतर केवळ देशभरातूनच नव्हे तर जगभरातून टीकेची झोड उमटली आहे.... आखाती देशांसोबत असलेल्या भारताच्या संबंधांवरही यामुळे अनिश्चिततेचं सावट आहे..</p>

source https://marathi.abplive.com/videos/news/maharashtra-nupur-sharma-update-maharashtra-1067074

Post a Comment

0 Comments